loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे चांडक प्लॉट रहिवाशींसह इतर परिसराच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा रोष लोकशाही पद्धतीने उपोषण करणार..!

Jul 22, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

गेल्या दोन वर्षांपासून सतत निवेदन देऊन सुध्दा समस्या सुटत नसल्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी नांदगाव नगरपालिका प्रशासन असमर्थ दाखवत असल्याने चांडक प्लॉट रहिवाशी यांनी येत्या २४ तारखेला लोकशाही पद्धतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की लेंडी नदीमध्ये मुख्य बाजार पेठेसह, शाळेतील मुला मुलींना येजा करण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन,बस स्थानक, दवाखाने अशा अनेक कारणांमुळे होणार्‍या समस्ये पासुन या भागातील रहिवासी अत्यंत त्रस्त झाले आहे. याच समस्येपासुन मुक्त होण्यासाठी लेंडी नदीपात्रात पुलबांधण्याची वरील रहीवाशांची मागणी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित पडलेली आहे.! नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे या स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे शहराच्या पूर्व आणी दक्षिण भागातील चांडक प्लाँट, करीमचाळ,जय भोले नगर येथील नागरिकांना पावसाळ्यात उध्दभवणार्या गंभीर समस्यां अद्याप न सुटल्याने रहिवाशांनी निवेदन सादर करुन उपाय योजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

माघील दोन वर्षापुर्वी आलेल्या महापुराने नांदगांव पालिकेच्या प्रभागातील निवासी प्लाॅट मधील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.
चांडकप्लॅाट,जयभोलेनगर (फुकटवाडी)व करीमचाळ या भागातुन वाहनारी लेंडी नदीला आलेल्या पुर पाण्याने या भागाला वेढादिला होता सलग एक महिना या भागातील रहिवाशांना लोहमार्गावरुन धोकादायक प्रवास करावा लागत असे आबलवृध्द आणी शालेय विद्यार्थी या सर्वांना आतोनात हाल सोसावे लागत होते या दरम्यान रुग्नाना झोळीकरुन खांद्यावर धरुन दवाखाण्यात आणावे लागत असे हा सर्व प्रसंग येथील नागरिकांनी व्यक्त करुन कथन केला होता.

रेल्वे ब्रिजवरुन तहसिलदार डॉ सिद्धार्थ मोरे व मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी प्रत्येक्षात येऊन पाहणी देखील केली होती दि २५/१/२२ दि ११/०५/२२ आम्ही दोन निवेदने दिली होती तरी सुद्धा दखल घेतली नाही.आम्ही नगरपालिका प्रशासनाचे सर्व कर भरतो तरी देखील दुर्लक्ष का..? भूमिगत गटारी कॉंक्रिटीकरण रस्ते यांची देखील मागणी केली होती..! गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी घेऊन जाण्यासाठी प्रसंग ओढवला तर.! आम्हाला रस्ताच नाही..! जीवितहानी झाली तर..? याला जबाबदार कोण..? म्हणुन आम्ही स्थानिक रहिवाशांनी दि २४/७/२३ रोजी लोकशाही पद्धतीने बेमुदत उपोषण करणार असल्याचे या नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. आता पावसाळा सुरु झाल्याने मागील वर्षासारखी बिकट अवस्था होऊ नये म्हणून नागरीकांनी निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी पालिका प्रशासनाने कडे केली आहे तसेच आंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा करणारी जलवाहीनीचे अपूर्ण कामे यांची देखील पूर्तता करण्याची मागणी केली आहे निवेदनावर आर.पी आय चे नांदगांव शहर अध्यक्ष महावीर जाधव व अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी परिसरातील महिला, जेष्ठनागरीक,तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.