loader image
[ays_poll id=7]

जैन मुनींच्या हत्येच्या निषेधार्थ मनमाडला मूक मोर्चा

Jul 23, 2023

मनमाड : कर्नाटकात जैन मुनी कामकुमारनंदी मुनीराज महाराज यांची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ मनमाड शहरात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती लावून जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी मंडल अधिकारी सोपान गुळवे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शहरातील जैन भवन ते एकात्मता चौक या मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. समाजाला धर्माचा संदेश देणाऱ्या मुनींच्या हत्येची कर्नाटकात घडलेली घटना ही अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी दोषींवर कडक शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने आचार्य कामकुमारनंदी महाराजांनी श्रद्धांजली वाहिली. या घटनेचा निषेध करत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शासन व न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावीत व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सदर प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालवले जावे, जैन मुनी, जैन तीर्थक्षेत्र संरक्षण केले जावे यासाठी जैन संरक्षण बोर्ड स्थापना केला जावा, अशा आशयाचे निवेदन जैन समाजाच्यावतीने देण्यात आले. यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे संघपती रिखबचंद ललवाणी, अध्यक्ष पोपटलाल सुराणा, श्री श्वेतांबर जैन मूर्तिपूजन संघाचे अध्यक्ष दिलीप शहा, श्री तेरापंथ महासभेचे अध्यक्ष नेमीचंद लोढा, श्री खं. आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष डॉ. नूतन पहाडे यांच्यासह मोठ्या संख्येने जैन बांधव, भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.