loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jul 23, 2023


सोशल मीडिया च्या आक्रमण काळात ही मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 167 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित आंतरशालेय निबंध स्पर्धा संपन्न

मनमाड शहाराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत वाचक सेवेचे या ब्रीद वाक्य घेऊन 109 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करीत मनमाड शहरात गेल्या 55 वर्षापेक्षा जास्त असणारी आंतर शालेय स्पर्धेची सांस्कृतिक परंपरा टिकवित मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाही स्व.लोकमान्य टिळकयांच्या 167 व्या जयंती निमित्त तथा स्व.अण्णाभाऊ साठे यांचे पुण्यतिथी निमित्ताने या महान लेखकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रविवार दि.23जुलै 2023 रोजी छत्रे हायस्कूल येथे आंतरशालेय निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. शालेय विद्यार्थ्यांना विविध विषय वाचनाची गोडी लागावी, लिखाणाची गोडी लागावी म्हणून या निबंध स्पर्धेचे आयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सातत्याने 55 वर्षापेक्षा अधिक काळापासून करण्यात येत आहे. सध्या संगणक, मोबाईल, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप अशा विद्यार्थ्यांना आकर्षित करणार्‍या सोशल मिडीयाचे वातावरणात मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित या निबंध स्पर्धेत 15 पेक्षा जास्त विद्यालयातील 478 शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनीनी उस्फुर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. यात प्रामुख्याने छत्रे न्यु इंग्लिश स्कुल, मरेमा विद्यालय (इंडियन हायस्कूल) , गुरुगोबिंद सिंह हायस्कूल, के.आर.टी.विद्यालय, गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल, केंद्रीय विद्यालय, एच.ए.के.हायस्कूल, बी जी दरगुडे स्कूल,संत बार्णबा हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल,मनोरमा सदन स्वामी विवेकानंद विद्यालय, कांचन सुधा स्कूल आदी प्रमुख विद्यालयांचा समावेश आहे. या निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना 10 दिवस आधी स्पर्धेचे विषय कळविण्यात येतात. 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत प्रथम 3 व 5 उत्तेजनार्थ अशी दोन्ही गटांना पुस्तकं व प्रमाणपत्र स्वरूपात पारितोषिके तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर सहभाग प्रमाणपत्र लोकमान्य सभागृह इंडियन हायस्कूल येथे मंगळवार दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01-00 वाजता संपन्न होणाऱ्या बक्षिस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. समाजव्यवस्थे वर सोशल मीडिया चे मोठे आक्रमण झालेले असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हे आजच्या काळात अतिशय धाडसाचे आहे. तरी देखील या कठीण काळातही मनमाड सार्वजनिक वाचनालय या स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना आपली लेखन कला दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे ही मनमाड सार्वजनिक वाचनालय च्याया आंतर शालेय स्पर्धा आयोजनाचे सातत्य हे मनमाडच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानाची बाब आहे. या निबंध स्पर्धेचे नियोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट संचालक नरेश गुजराथी माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी यांनी केले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय सानप, , अभिषेक पितृभक्त , सिद्धेश परब, आदी मान्यवरांचे अनमोल सहकार्य लाभले. या स्पर्धेचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी ,हेमंत मटकर, सौ.नंदिनी फुलभाटी मच्छिन्द्र साळी आदींनी केले.


अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.