loader image
[ays_poll id=7]

नांदगाव  येथील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजयी दिनानिमित्त अभिवादन

Jul 26, 2023


 

नांदगाव ( प्रतिनिधी) येथील हुतात्मा स्मारकावर कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्यात १९९९मध्ये झालेल्या युध्दाचा शेवट २६ जुलै १९९९ ला भारताच्या जवानांनी प्राणांची बाजी लावुन भारताला विजय मिळवून दिला व आपल्या देशाचे संरक्षण केले. या युध्दात शहीद झालेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा चौकात तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे, नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व सेवानिवृत्त ,मेजर, व सैनिक यांनी सर्व प्रथम संविधान प्रतिकृतीला पुष्पहार घालून वंदन केले. व त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी मेजर नानासाहेब काकळीज यांनी कारगिल युध्दाच्या आठवणी जागवल्या व युध्दप्रसंगातील अनुभव कथन केले. तसेच यावेळी मेजर जगन्नाथ साळुंखे यांनी देखील कारगिल युध्दाची माहिती देऊन येथील हुतात्मा स्मारक निर्मिती कशी झाली याबाबत माहिती सांगितली व शहीद जवानांना अभिवादन केले. या कार्यक्रमाचे संयोजन शिवसंस्कार संस्था,व माजी सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले. याप्रसंगी सुभेदार बाजीराव मोहिते, हवालदार शंकर थेटे, सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष नानासाहेब काकळीज, संजय खैरनार,दै.आवाजचे संपादक भगवान सोनवणे,बापू जाधव, मुस्ताक शेख, भावराव जाधव, मधुकर पवार, प्रभाकर पगारे, योगेश जाधव, संदिप बोरसे, श्रावण आढाव, अनंत शेवरे,शामभाऊ पारख, मनोज शर्मा, शिवाजी निकम, शिवाजी गरुड, प्रा. सुरेश नारायणे, गंगाधर औंशिकर,विजय बोरसे, किसन जगधने, वामन पोतदार, सुमित गुप्ता, अकाश पानकर, जेष्ठ नागरिक, व्यापारी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित माजी सैनिक व जेष्ठ नागरिक यांचा सत्कार नांदगावचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी केला.व शहरातील सामाजिक स्वास्थ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.