loader image
[ays_poll id=7]

के आर टी हायस्कूल मध्ये पालक मेळावा संपन्न

Jul 26, 2023


दिनांकः २४/०७/२०२३

येथील कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये नुकताच प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविदयालय विभागाचा पालक मेळावा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता या पालक मेळाव्यात शिक्षक-पालक कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली.

प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिक्षक-पालक मेळाव्यात श्री. मुकेश मिसर यांनी आपल्या मनोगतात समितीची मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली याबाबत उपस्थित पालकांना माहिती दिली. या मेळाव्यात इयत्ता १ ली ते ११ वी पर्यंतच्या वर्गाच्या कार्यकारी समितीकरीता पालक प्रतिनिधींची निवड लोकशाही पध्दतीने करण्यात आली. प्राथमिक शिक्षक-पालक कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी श्री. सचिन विजय सांगळे यांची निवड करण्यात आली. तर विविध वर्ग प्रतिनिधी म्हणून श्री. प्रविण शेजवळ, श्री. प्रेमकुमार सुर्यवंशी, श्री. हेमंत अग्रवाल, सौ. साधना हादगे, सौ. नीता भावसार, सौ. गौरी अडावतकर व सौ. निता चिंडालिया यांची निवड करण्यात आली.

तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-पालक कार्यकारी समितीच्या उपाध्यक्षपदी श्री. राजबहादूर खत्री यांची निवड करण्यात आली. तर विविध वर्गप्रतिनिधी म्हणून श्री. विकास कराड, सौ. राधिका दराडे, सौ. सुजाता सांगळे, सौ. गौरी शर्मा आणि सौ. शिल्पा नागरे यांची निवड करण्यात आली.

तसेच या पालक मेळाव्यातील माता-पालक संघाची देखील स्थापना करण्यात आली. माता-पालक संघाचे प्रतिनिधी म्हणून सौ. मनिषा बारगाजे, सौ. जया पगारे, सौ. आदिती महाजन, सौ. स्नेहल मानकर, सौ. निर्मला पद्मने, सौ. स्वाती सोमासे, सौ. उज्वला दराडे यांची तर इ. १० वी तील कु. श्रावणी अमर चव्हाण या विदयार्थिनीची निवड करण्यात आली.

पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. मुकेश मिसर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांनी मांडले. तसेच चालू शैक्षणिक वर्षाचा अहवाल सौ. रूपाली निंभोरकर व सौ. संगिता कदम यांनी मांडला. विविध शिष्यवृत्तींची विस्तृत माहिती श्री. राम महाले यांनी उपस्थितांना दिली. श्री. मुकेश मिसर यांनी शिक्षक-पालक संघाचे महत्व व इतर बाबींवर मार्गदर्शन केले. याशिवाय पालक मेळाव्यात विदयार्थी गुणवत्तावाढीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शैक्षणिक विकासाची परंपरा आम्ही मजबूत ठेवू व आमचे विदयार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू. पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद अतिशय महत्वाचा असून तो पालक-शिक्षक सभेपूरताच न ठेवता कायमस्वरूपी ठेवावा असे आवाहन श्री. मुकेश मिसर यांनी उपस्थित पालकांना केले.

निवड झालेल्या सर्व प्रतिनिधींचे शाळेच्यावतीने स्वागत करण्यात आले. पालक मेळाव्यास पालक मोठया प्रमाणात उपस्थित होते. या पालक मेळाव्यास उपप्राचार्य श्री. वैभव कुलकर्णी आणि संस्थेचे श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट (NEP -2020 Connect) कार्यशाळा संपन्न

  मनमाड - आधुनिक काळा बरोबर शिक्षण व्यवस्था ही बदलली पाहिजे कौशल्यपूर्ण शिक्षण आणि उत्तम...

read more
बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने  हत्याकांड –  पत्नी,मेहुणी,साडू,  सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

बघा व्हिडिओ-जातेगांव महादेव डोंगरावरील दिपक सोनवने हत्याकांड – पत्नी,मेहुणी,साडू, सामील नांदगाव पोलिसानी २४ तासात खुनाचा उलगडा करत ठोकल्या बेड्या

नांदगाव : मारूती जगधने नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा...

read more
बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

बघा व्हिडिओ-वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड च्या कुटुंबाला आमदार कांदे यांची मदत

गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून...

read more
बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

बघा व्हिडिओ-ना.छगन भुजबळ यांनी पाठविलेल्या समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आंदोलक प्रा. हाके यांची घेतली वडीगोद्री येथे भेट

  नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे...

read more
.