loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व्याख्यान संपन्न

Jul 29, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके यांनी आपल्या मनोगतातून 1857 ते 1913 पर्यंतचा शिक्षणाचा विस्तार कसा होत गेला हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी पुढे बोलताना म्हटले की नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट हे 2050 पर्यंत भारतातील नागरिक शंभर टक्के सुशिक्षित झाले पाहिजे हे आहेत पुढे त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आकृतीबंधाचा(5+3+3+4) परिचय विद्यार्थी व प्राध्यापकांना करून दिला हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे उपयुक्त आहे हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण, श्रेयांक पद्धतीचा अवलंब, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, संप्रेषण कौशल्यावर भर, सामाजिक जबाबदारी वर भर, रोजगार क्षम शिक्षण या घटकांवर भर देण्यात आलेला आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता व आवश्यकता विद्यार्थ्यांना पटवून सांगितली. हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास परिणामी तो देशाचा चांगला नागरिक होण्यासाठी उपयुक्त आहे,त्यामुळे या धोरणाला यशस्वी करण्याची जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांना उचलावी लागणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस.देसले, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य श्रीमती ज्योती पालवे मॅडम, कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे,महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. जे. डी. वसईत डॉ. जे.वाय. इंगळे डॉ. आर.डी.भोसले पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे, प्राध्यापक विठ्ठल फंड सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश गांगुर्डे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जे. डी. वसईत यांनी केले आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त...

read more
प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड च्या गिरी प्रेमींनी दुर्ग पूजन व ध्वजारोहण करत साजरा केला मूर्ती प्रतिष्ठापना क्षण

प्रभु श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अगस्ती ऋषींचा वास्तव्य असलेल्या किल्ले अंकाई...

read more
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या ऐतिहासिक आंदोलनामध्ये ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड चे महत्वपूर्ण गौरवास्पद योगदान          देव,धर्म आणि राष्ट्र कार्याची स्वप्न पूर्ती ➖नितीन पांडे

मनमाड - सोमवार 22 जानेवारी 2024 (पौष शुद्ध द्वादशी )विश्वा तील सर्व हिंदू बांधवान साठी ऐतिहासिक...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

वितरण सोहळा होणार २३ जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर आश्रमात सुरू...

read more
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे विदयार्थीनींचा संघ नमो चषक तालुकास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेता.

उमराणे:- जि.प. विद्यानिकेतन, देवळा येथे झालेल्या नमो चषक 2024 क्रीडा चषक अंतर्गत देवळा...

read more
.