loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Aug 1, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतातून डॉ सुभाष निकम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये प्रबोधन निर्माण करण्याचे कार्य केले. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टिळकांनी जहाल विचारसरणीचा अवलंब करून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे समन्वयक मा. डॉ. अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या “अपूर्व दत्तक योजनेमध्ये” महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला या योजनेअंतर्गत लाभार्थीं विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ सुभाष निकम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप ढमाले यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.