loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व जुनियर कॉलेज मध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

Aug 2, 2023


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर. उपस्थित होते
” क्रांतीची मशाल पेटली
सिंहाची सिंहगर्जना गरजली
स्वातंत्र्याची नवी प्रेरणा
टिळकांनी जनतेला दिली.
भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे. आजही ज्यांचे नुसते नाव घेतले. तरी ऊर अभिमानाने भरून येतो .असे व्यक्तिमत्त्व म्हणजे “लोकमान्य टिळक” प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन .रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात २३ जुलै १८५६ रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. आणि या तेजस्वी सूर्याच्या प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक .टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लक बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते.” बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले .आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हातच धरू शकत नव्हते. टिळकांच्या लहानपणीची गोष्ट एकदा गुरुजी वर्गात गणित विषय शिकवत होते. सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली. आणि सोडवायला सुरुवात केली .टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्य क्रमाने अचूक सांगितले. टिळकांची कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींना सुद्धा खूप आश्चर्य वाटले. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. टिळकांनी लोक जागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्र सुरू केली. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले .लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू होता.
” जहाल विचारसरणी होती
लेखणी तलवार होती
प्रखर त्यांच्या विचारांनी
ब्रिटिश सत्ता हादरली होती”
आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकद टिळकांमध्ये होती. ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारवर टीका करत १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आव्हान केले. त्यांच्या हक्काबद्दल जागरूक केले .आणि केसरी वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. १८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
भारतीय समाजाचा नाश करण्यासाठी इंग्रजांनी केलेले अत्याचार पाहिल्यानंतर टिळकांनी आपले जीवन भारत आणि भारतातील जनतेला ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समर्पित केले.
टिळक जहालवादी होते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रक्त सांडावेच लागेल नाहीतर मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत राहणार नाही. असे ते मानत “कितीही संकटे आली आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी.!” असे ते म्हणत आणि अशाच आत्मविश्वासाने त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले. अशा या थोर नेत्याचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. आजही त्यांचे नाव. त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरले आहेत. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम.
” पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती.
होवोनिया बेभान धावले भारत मातेसाठी.
कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे.
संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे!”
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता चौथीच्या आरोही बोरणार. नंदिनी कुंदलके . इयत्ता नववीची सृष्टी सांगळे. हर्षदा कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना सचिन बिडवे व सौ. पंचशीला पगारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौरी सानप व जयश्री कोल्हे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.