loader image
[ays_poll id=7]

शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

Aug 4, 2023

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक, शिक्षक आमदार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ अपूर्व प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ बी एस देसले व कुलसचिव श्री.समाधान केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिबन क्लब यांच्या वतीने करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदिष्ट थेलेस्मिया किंवा रक्ताचे दुर्गम आजार असणाऱ्या व्यक्तींना सुलभ रक्त उपलब्ध व्हावे हे होते. यासाठी उपजिल्हा रुग्णालय मनमाड चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन राऊत, शासकीय रक्तपेढी चे डॉ.मंगेश राठोड, डॉ. मयूर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती किरण वैष्णव, जितेंद्र बिरारी, संतोष नारखडे , मंगेश कुवर, एकनाथ बनसोडे,अनिल मोरे, अथर्व खैरनार, सौरभ अहिरे, पुनम अंभोरे, लोकरे मामा, सौरभ गुप्ता व नरेंद्र कोल्हे यांच्या टीमने रक्तदानासाठी काम केले. या रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या हस्ते झाले. तर उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे रुग्णांना फळ वाटप उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख प्रा. प्रकाश बर्डे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विठ्ठल नजधाने एन.एस.एस. स्वयंसेवक,एनसीसी कॅडेट तसेच उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.