loader image
[ays_poll id=7]

नांदगावच्या जेष्ठ नागरिक संघाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Aug 5, 2023

नांदगाव (प्रतिनिधी) समाजात ज्या चांगल्या घटना घडतात त्यांची दखल जेष्ठ नागरिक संघ घेऊन त्यांचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन करतात. ही समाजाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याची समाजातील इतर संस्थांनी आदर्श घ्यावा असे मविप्र संस्थेचे नांदगाव तालुका संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमित बोरसे (पाटील) म्हणाले. ते येथील जेष्ठ नागरिक संघाने नांदगाव शहरातील विविध शाळा -महाविद्यालयात दहावी व बारावीत विशेष गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव विरंगुळा केंद्रात संपन्न झाला. या प्रसंगी ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तसेच यावेळी नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे,रमेश बोरसे,ॳॅड.चौधरी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण आढाव, उपाध्यक्ष जयवंत साळवे, सुरजमल संत,कुदरत अली शहा , शिवाजी गरुड, विलास बच्छाव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. जेष्ठ नागरिकांच्या अनुभव, शिस्त, संस्कारांचा आदर्श गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा.जेष्ठ नागरिक समाजात अनेक उपक्रम राबवुन समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम करत आहे त्याचाच विद्यार्थी गुणगौरव समारंभ हा एक भाग आहे. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा.असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॉ.एस.एन. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. या प्रसंगी दहावीत विविध शाळेत प्रथम आलेले विद्यार्थी
वैष्णवी प्रविण जावरे, मोहिनी सोमनाथ देशमुख,दर्शनी विनायक कुमावत,पायल गोरख काकळीज,चंचल राजेश सानप, वैभवी रविंद्र वाघ,आफिया जाविद खाटीक,जुबिया अन्सारी रफिक,पुनम निलेश सुराणा, संस्कृती किरण डोंगरे, तर गंगाधर ओंकार कोल्हे, कला शाखेत प्रथम, प्रसाद भालचंद्र चौधरी, वाणिज्य शाखेत प्रथम,दिनेश लउनसइंग पुरोहित बारावीतील प्रथम विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी चंचल सानप,किरण डोंगरे पालक,सानप ताई पालक, प्रसाद चौधरी यांनी गुणगौरव केल्याबद्दल जेष्ठ नागरिक संघाबद्दल आदर भावना व्यक्त केली. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण आढाव यांनी जेष्ठ नागरिक संघ विविध समाजोपयोगी जे उपक्रम राबविले जातात या बद्द्लची माहिती अध्यक्षीय भाषणात दिली. व चंचल सानप या विद्यार्थ्यांनीस पुढील शिक्षणासाठी पाचशे रु. दिले तर प्राचार्य डॉ. शिंदे यांनी या मुलीस महाविद्यालयात येण्यासाठी सायकल देणार आहे हे सांगितले तर नइळकमल फोटो स्टुडिओ चे संचालक सोनल दंडगव्हाळ यांनी या विद्यार्थ्यांचे पासपोर्ट फोटो प्रा देण्यात येईल असे सांगितले. या सर्वांचे जेष्ठ नागरिक संघाने आभार व्यक्त केले. यावेळी मविप्रचे संचालक अमित बोरसे यांनी भविष्यात जेष्ठ नागरिकांना मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांचे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष शिवाजी निकम यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमाकांत सोनवणे, शिवाजी गरुड, गंगाधर थोरात,विलास बच्छाव, कारभारी काकळीज,भिका पाठक, रंगनाथ चव्हाण, कृष्णा रत्नपारखी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.