loader image
[ays_poll id=7]

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्राच्या रंगमंचाचे उद्घाटन

Aug 5, 2023

मनमाड – “मनमाड शहरात सांस्कृतिक चळवळीची पुन्हा पायाभरणी करण्यासाठी ‘साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्र’ ह्या भव्य रंगमंचाचे उद्घाटन करताना आपणास मनस्वी आनंद होत आहे. पुढील महिन्यात या मंचावर जिल्हा पातळीवरील एकांकिका स्पर्धांचे आयोजन करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंचा खऱ्या अर्थाने कृतीशील वारसा चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे प्रतिपादन सागर आर्टचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक हिरामण मनोहर यांनी केले.
न.प. इमारतीमधील महात्मा फुले वाचनालय अभ्यासिका प्रांगणात जनहित विकास संस्थेने लोकवर्गणीतून साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्र म्हणून उभारलेल्या भव्य अशा रंगमंचाच्या उद्घाटनप्रसंगी हिरामण मनोहर बोलत होते. अध्यक्षस्थानी मनमाड बचाव समितीचे पुंडलिक कचरे होते.
“आज राजकारणासह सर्वच क्षेत्रात वाढलेल्या दूषित- कलुषिततेचा निचरा होऊन सर्व क्षेत्रे प्रवाहित होण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्र वाढीस लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच जनहित विकास संस्थेने साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कला अकादमी केंद्राची निर्मिती केलेली असून मनमाडमधील मुला-मुलींसह प्रौढ कलाकारांना टी.व्ही.वर देखील झळकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे,” अशी माहिती सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते शाहीर अशोकआप्पा परदेशी यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अलका महाजन, सुषमा तिवारी, नरेंद्र कांबळे, कृष्णा पगारे, राजू लहिरे यांनीही आपापली मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर आर्ट फिल्मच्या लघुपटातील दिग्दर्शक राजू लहिरे ,अभिनेत्री सीमा चौधरी, सिनेकलाकार अनिल पगारे, चेतन थोरात, सुरेश अहिरे, अक्षय गोसावी, संतोष परदेशी या सिनेकलाकारांचा उपस्थित विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत रमेश खरे यांनी तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन उपाली परदेशी व मनोज गांगुर्डे यांनी केले. पुष्पक खरे, सूर्यकांत राजगिरे, मोतीराम भालेराव, बी.टी.पद्मने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. रश्मी मोरे,लीला राऊत, सुनीता महाले, शमशाद सय्यद,सुवर्णा निकम, रामदास पगारे,बबीता चिंडालिया, सुनिता राजगिरे, आर.बी. ढेंगळे, यशवंत बागुल, महेश दारुंटे, अर्जुन साळवे,मधुकर मोरे, आहिरे दादा आदींनी सहभाग दिला.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.