शिंगवे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीला पाणी लागल्याने शिंगवे गावचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला आहे. शिंगवे गावात ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन ग्रामपंचायत कार्यालय जवळील पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच आत्माराम खताळ यांच्या हस्ते सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. उपसरपंच नंदू खताळ,शिवाजी पाटील,रामा खताळ,बळीराम गांगुर्डे, बाळकृष्ण खताळ, किरण बोरसे,अण्णा गुंड, संजय बोरसे, सागर झाल्टे, संतोष मढे,दादा पिंपळे, सुनील काळे, रमन डावरे,संदीप गुंड,अनिल मढे, उमेश कापसे,गुलाब शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते.
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन
मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...






