loader image
[ays_poll id=7]

नवक्रांतीची ज्योत तेवत ठेवा ,क्रांती दिनी निर्धार नवक्रांती युवक सघांचा ५ वा वर्धापन दिन उत्सवात साजरा

Aug 10, 2023


नांदगाव प्रतिनिधी

देशावर,राज्यावर बोलण्यापेक्षा गावावर बोला आणि क्रांतीदिन साजरा करतांना ज्या हुतात्म्यांमुळे आपण स्वातंत्र्य भारतात जगतोय त्यांचे बलिदान आठवून नवक्रांती विचार समिती मध्ये सहभागी होऊन येणाऱ्या काळात बदलाचे शिल्पकार व्हा असे मत नवक्रांती युवक संघाचे संस्थापक भगवान सोनवणे यांनी शहरालगत असलेल्या ‘माऊली भोजनालय’ येथे आयोजित नवक्रांती युवक संघाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित नवक्रांती विचार समिती सहविचार बैठकीत व्यक्त केले.
9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त नवक्रांती युवक संघाचा 5वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्त ‘नवक्रांती विचार समिती’स्थापन करण्यात आली.ज्या सोबत येणाऱ्या काळातील निवडणूका आपल्या बळावर लढण्याचे उपस्थितांनी ठरविले.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीचे प्रतीक असलेल्या मशालीचे हार घालून पूजन तसेच मान्यवरांच्या हातून मशाल पेटवून झाली.तदनंतर नवक्रांतीचे संस्थापक भगवान सोनवणे यांच्याहस्ते उपस्थित झालेल्या प्रत्येक मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ऍड. किरण जाधव यांनी नवक्रांती युवक संघाचे संस्थापक भगवान सोनवणे यांचा जीवनपट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली.उपस्थितांपैकी
पक्ष दिल्लीत आहे मी गल्लीत काम करतो समस्यांना वाचा फोडताना पांगलेली मोती एका माळेत आणावेत ,पुढच्या पिढीचा विचार करावा.मी एकदा शब्द दिला तो ठाम आहे.नवक्रांती विचार समिती सोबत गावाच्या ,तालुक्याच्या विकासासाठी कायम सोबत आहे असे मनोगत आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले यांनी व्यक्त केले तर शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी आपल्याला या मार्गावर आणण्यासाठी भगवान सोनवणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून ते कुणालाही हा मोठा व्हावा यासाठी निस्वार्थ मार्गदर्शन करतात आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत असे सांगीतले तर शिवाजी जाधव (चांदोरा) यांनी येथे जमलेला प्रत्येक माणूस क्रांतिकारी आहे.सर्व सोबत राहून एक जुटीने क्रांती करण्याची वेळ आली आहे.आम्ही कायम नवक्रांती सोबत आहे असे मत व्यक्त केले तर योगेश वाघ(शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष) यांनी दबलेला आवाज उठविण्याचे काम भगवान सोनवणे करत आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे सांगितले.सुनिल सोनवने(rti कार्यकर्ते , ग्रा.प.सदस्य गिरणांगर ) यांनीही आपल्या मनोगतात नवक्रांती सोबत असल्याचे सांगत नवक्रांती विचार समितीला पाठिंबा दिला पुढे भिमराज लोखंडे(भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन न्यास,तालुकाध्यक्ष) यांनी आपण निवडून दिलेले ते आपले सेवक आहे आपण शिपायाला साहेब म्हणतो. आपले महत्व समजून घेऊन सर्वांनी एक जुटीने उभे रहा असे सांगितले
तर विचारांनी भेटलेलो मी आज अनेक वर्षांपासून माऊली सोबत आहे.आज 9 तारीख, नव नवक्रांती विचार समिती स्थापन करून क्रांतीची मशाल पेटली आहे आणि आम्ही कायम नवक्रांती सोबत आहे असे मत युवा मल्हार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बिरुभाऊ शिंदे यांनी व्यक्त केले पुढे
डाॅ जर्नादन पगार(तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष तथा जिल्हाध्यक्ष मानवाधिकार फेडरेशन) यांनी बोलतांना सांगितले की गरीबासाठी व शालेय विद्यार्थ्यांना मदत करणारा माणुस म्हणजे भगवान सोनवने होय .मी त्यांच्या सोबत आहे असे सांगितले
निलेश चव्हाण (स्वाभिमानी शेतकरी संघटना) सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून मी वैयक्तिक भगवान भाऊ यांच्या सोबत असल्याचे सांगितले तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भास्कर झाल्टे यांनी ज्याच्या जवळ काही नाही,ज्याच्या कडे गमविण्यासारखे काही नाही असा मानूस क्रांती करु शकतो सर्वाना कुणी तर आपला नेतृत्व करणारा मान्य करावा लागेल जेणेकरून हि मोट बांधली जाईल आणि नवक्रांती होईल असे संबोधले त्यानंतर २४ तास सेवा देणारे सोनवने हे वास्तव मांडत आहे त्यांच्या कामाचे कौतुक नव्हे तर कायम सोबत आहे असे स्पष्ट मत माउली सरोदे यांनी व्यक्त केले तर माजी नगरसेवक यशवंत शिंदे यांनी आपल्या मनोगतात “लोक विकले जातात .जनतेची सेवा करणारा मानूस म्हणजे सामन्य कुटुंबातील भगवान सोनवणे आहे.त्यांबाबाबत मागेपुढे कुजबुज करणाऱ्यांनी त्यांच्या केसाला हि धक्का लावून पहा संपूर्ण तालुका त्यांच्यासोबत उभा राहील असा ठाम विश्वास दिला तर डॉक्टरवाडीचे माजी उपसरपंच देविदास देवरे यांनी केवळ शुभेच्छा नव्हे तर आपण प्रत्येकजण नवक्रांती विचार समिती सोबत राहून क्रांतीचे शिल्पकार होऊ असे मनोगतातून सांगितले तर पौराणिक कथेचे उदाहरण आपण सर्व नवक्रांतीचे जनक व साक्षिदार बनस, आपल्या जीवनात क्रांतीची मशाल पेटवा
असे मत जेष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .सोमनाथ मगर(तालुकाध्यक्ष कांदा उत्पादक संघटना),अंबादास मोरे, राजेंद्र जाधव पत्रकार,दिनेश राऊत, श्रावण सरोदे,साहेबराव सरोदे,सुनिल सरोदे,शारीक मोमीन,अक्रम शेख,महेश माळी,शंकर कोकाटे,मोहन पवार,अशोक मोरे,अनिल धामणे पत्रकार ,सुधीर शेवाळे,गणेश सरोदे,निंबा बोरसे,सचिन साळुंके,संजय साळुंके,आकाश हिरे, संभाजी गायकवाड,दिपक वाघ,अरुण पवार(माजी उपसरपंच परधडी),विजय खालकर,गोरख जाधव,नवनाथ बोरसे,शिवाजी वाघ,राधेशांम खांदेशी,बाळासाहेब वाघ,सुदाम वाघ,नानासाहेब पटाईत,रामलाल राठोड,संतोश सरोदे,सुरेश सोनवने,नाना शेवाळे,आक्रम शेख,बसून खान,सहास पुणतांबेकर ,प्रज्ञानंद जाधव पत्रकार, पत्रकार संजय मोरे, शंकर मोरे रोहीत विसपुते,शंकर विसपूते आदी मान्यवर उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.