loader image
[ays_poll id=7]

पाणी चोरी करतांना आढळल्यास होणार कडक कारवाई – वैभव भागवत

Aug 11, 2023

मनमाड शहरासह मनमाड रेल्वे स्थानक, आंबेगाव ग्रामपंचायत, येवला शहर आणि तालुक्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले आहे. सदर पाणी बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्यालगत कोणी जर पाणीचोरी करतांना आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिला आहे.

पालखेड डाव्या कालव्यातून शासनमान्य असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ६ ऑगस्ट रोजी बिगरसिंचनचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यात मनमाड पाणी पुरवठा योजना, मनमाड मध्य रेल्वे पाणी पुरवठा योजना, आंबेगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, येवला शहर पाणी पुरवठा योजना, येवला तालुका ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धरणात पाण्याचा येवा कमी असल्याने पालखेड डाव्या कालव्यावरील बिगरसिंचन संस्थांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हे आवर्तन बिगर सिंचनाचे असल्यामुळे कालव्या लगत असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी या कालव्यातून अनधिकृतपणे पाणी उपसा करून पाणीचोरी करू नये. अशा स्पष्ठ सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पाणी चोरी करतांना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.