Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अखंड भारत दिनानिमित्त मनमाड शहर भाजपा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

Aug 12, 2023

सलग 19 व्या वर्षी यंदा ही मनमाड शहर भाजपा तर्फे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी अखंड भारतदिना निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांना (शहिदांना) रक्तदानाने आदरांजली देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याच देशभक्तीच्या परंपरेला अखंडपणे सुरु ठेवत यंदाही 76 व्या स्वातंत्र्य दिना च्या पूर्व संध्ये ला अखंड भारत दिना निमित्ताने सलग 19 व्या वर्षी सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.00 ते 3.00 वाजेपर्यंत लोकमान्य सभागृह, इंडियन हायस्कुल येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन मनमाड शहर भाजपतर्फे करण्यात आले आहे.या रक्तदान शिबीर कार्यक्रम ला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारती पवार व भाजपा नासिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय शंकरराव वाघ हे उपस्थित राहणार आहेत तरी या रक्तदान शिबीरात मनमाड शहर व परिसरातील सर्व ऐच्छिक रक्तदात्यांनी येवून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना रक्तदानाने आदरांजली वाहावी असे आवाहन रक्तदान शिबीराचे निमंत्रक ,भाजप मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी व रक्तदान शिबिर संयोजक भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले आहे. रक्तसंकलन जनकल्याण रक्तपेढी नाशिक करणार आहे.

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]