loader image
[ays_poll id=7]

कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट

Oct 1, 2026

मनमाड शहरालगतच असलेल्या कंचन सुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवेच्या वतीने वि‌द्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत दैनंदिन जीवनातील व्यवहार, सामाजिक जाणीव आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी मनमाड शहरातील Reliance Mart, जैन मंदिर, भाजी मंडई आणि गुरु‌द्वारा येथे शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी Reliance Mart येथे विविध वस्तूंची मांडणी, वर्गीकरण, किंमत व खरेदी-विक्रीची प्रक्रिया यांचे निरीक्षण केले. त्यानंतर भाजी मंडईत विविध भाज्या, वजन, किंमत ठरविणे तसेच विक्री-खरेदीची प्रत्यक्ष पद्धत समजून घेतली.

यानंतर विद्यार्थ्यांनी जैन मंदिर व गुरु‌द्वाराला भेट देऊन शांतता, शिस्त, स्वच्छता, प्रार्थना आणि सर्वधर्मसमभाव यांचा अनुभव घेतला. सर्व धर्माचा आदर, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

या क्षेत्रभेटीत संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयजी जैन, समन्वयिका सौ. राणीजी भंडारी, प्राचार्य श्री. पी. एन. पांडा, सुपरवायझर आकांक्षा आव्हाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले.

वि‌द्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध नवीन गोष्टी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतल्या. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, व्यवहारज्ञान, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वासाला चालना मिळाली. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आनंददायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरला.

अजून बातम्या वाचा..

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालता येणार नाही, पण दिवसभरही फोडता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

आगामी दिवाळीच्या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या वापराबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने...

read more
अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

अंडरपास दुरुस्तीसाठी बंद झाल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना करावी – संतोष गुप्ता

रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नांदगाव शहरातील रेल्वे अंडरपास मध्ये...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी  विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पालखी विसर्जन मिरवणुकीत व्यसन मुक्तीचा सामाजिक संदेश

    मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व सार्वजनिक गणेश उत्सवातील प्रथम मानाचा...

read more
.