मनमाड येथील साहित्यिक, छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ,पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा या कवितेस देशाच्या राजधानीतून अकरा हजार रुपयांचा
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील साहित्य अधिष्ठान समूह तर्फे हिंसाचार,दंगली तसेच अस्वस्थ परिस्थिती यावर विविध भाषांतून राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते,यात मराठी भाषेतील संदीप देशपांडे यांची दंगलनामा कविता पुरस्कार प्राप्त ठरली. या यशाबद्दल संदीप देशपांडे यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. दंगली बाबतची अस्वस्थता व भीषण परिस्थिती नेमक्या शब्दात
मांडून श्री देशपांडे यांनी या पुरस्कारावर मोहर उमटवली असे निरीक्षण तज्ञ समितीने नोंदवले आहे.
मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वनरक्षक पदी नियुक्ती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड...











