loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 19 व्या वर्षी भारती अखंड भारत दिनी आयोजित रक्तदान शिबीरात 26 रक्तदात्यांचे रक्तार्पण शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांचे 106 व्यानदा रक्तदान

Aug 15, 2023


मनमाड – भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने (14 अखंड भारत दिनी ) मनमाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन 2005 पासून यंदा सलग 19 व्या वर्षी स्वातंत्र्ययुध्दात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशासाठी प्राण अर्पण करणार्‍या शहीद सैनिकांना रक्तदानाने आदरांजली वाहण्यात आली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे रक्तदाते व भाजपा मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार,जनकल्याण रक्तपेढी चे संचालक प्रदीप गुजराथी,जेष्ठ भाजपा नेते नीलकंठ त्रिभुवन, आदी मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. शिबीर संयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी गत 19 वर्षापासून अखंड भारत दिनाचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ऐच्छिक रक्तदात्यांच्या सहकार्याने हा रक्तदानाचा यज्ञ सुरु ठेवला आहे. कोरोना संकट काळात भाजपा मनमाड तर्फे कोविड रुग्णांनसह इतर सर्व रुग्णाना रक्ता संबंधित भरीव मदत झाली असल्याचे याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले. भाजपतर्फे 2005 पासून सलग या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. एकच तारीख, एकच ठिकाण, एकच संयोजक व एकच रक्तपेढी असे सलग 19 वर्ष होण्याचा हा विक्रम या रक्तदान शिबीराच्या संयोजनाने मनमाड भाजपने केला आहे. गेल्या 19 वर्षात सुमारे 926 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबीरात सहभाग नोंदवला आहे. यंदाही 26 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून स्वातंत्र्यवीरांना या रक्तदान शिबीरात रक्तदानाने श्रध्दांजली वाहिली. या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास , भाजप जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, जिल्हा कार्य सदस्य महेंद्र गायकवाड, शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार, सौ जयश्री कुंभार ,महिला मोर्चा शहर सरचिटणीस अक्षदा पगारे भाजपा व्यापारी आघाडी चे विनोद शर्मा, भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे ,शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे,बुधन बाबा शेख ,ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस गौरव ढोले, केतन देवरे ,शहर चिटणीस नारायण जगताप, धीरज भाबड, भाजपा अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष आशिष चावरिया ,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील , सचिन हिरालाल लूनावत,सुमेर मिसर,भाजपा दिव्यांग आघाडी चे सप्टेश चौधरी,मुकेश वेलूलू आनंद सेवा केंद्राचे प्रमुख कल्पेश बेदमुथा, राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे अनंता भामरे,गणेश कुणगर अक्षय सानप, अभिषेक पितृभक्त संतोष भराडे, अक्षय खताळ, नितीन उगलमुगले, मिलिंद गोविलकर, राजेश पाटील, प्रवीण धाकराव, विजय माळवकर, सुनील केकाण, सौरभ कुलकर्णी,किरण देव,अमोल औटी, अनंता कुलकर्णी, संजय आरोटे,अजित राऊळ आदीं मान्यवरा सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व रक्तदाते याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या गौरव प्रमाणपत्र देवून रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला. नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने डॉ.संजय कुलकर्णी ,अशोक कुळकर्णी यांनी रक्तसंकलन केले. शिबीराचे संयोजन जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केले तर भाजपा मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.