loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – ग्रामसेविका एस,एस खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन

Aug 15, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावातील ग्रामसेविका एस. एस. गडाख यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात दर्शन शिदें या युवकाचे पंचायत समिती कार्यालया शेजारील पाण्याच्या टाकीवर चढून शाले स्टाईल आंदोलन .

याबाबत सविस्तर माहीती अशी की पोखरी येथील ग्रामसेविका या मुख्यालयी रहात नाही . दलीत वस्ती अंर्तगत कामे न करताही बिले काढली गेली. ग्रामसभा फक्त कागदोपत्री दाखविली जाते . माहीतीच्या अधिकारात माहीती मिळत नाही . म्हणून दर्शन शिदें या युवकाने पंचायत समिती कडे वेळोवेळी अर्ज करून माहीती मागविली होती परंतू त्याला कार्यालयाकडून माहीती दिली गेली नाही. सोमवारी दर्शन याने पंचायत समिती मध्ये जावून आपण १५ ऑगष्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे लेखी दिले होते तरीही या कार्यालयाने ह आंदोलन गंभीरतेने घेतले नाही गटविकास अधिकारी नेहमी प्रेमाणे कार्यालयात उपस्थित नव्हते .तहसिल कार्यालयातील झेडांवदंन आटोपताच या युवकाने टाकी वर चढून घोषणा देण्यास सुरवात केली तेव्हा प्रशासन जागे झाले. यावेळी पो. नि. प्रितम चौधरी हवालदार दत्ता सोनवणे यांनी त्वरीत आंदोलनकर्ता दर्शन शिदें याच्याशी फोन वरून संपर्क ळेला . यावेळी प्रशासन विकास अधिकारी संदीप दऴवी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी देविदास मांडवडे विस्तार अधिकारी विजय ढवऴे यांनी फक्त पाहण्याची,भुमिका घेतली . एक ते दीड तास आंदोलन चालू होते यावेळी आंदोलन कर्ता ग्रामसेविका गडाख यांना समक्ष समोर बोलविण्याची मागणी करीत होता . तरीही ग्रामसेविका गडाख यांच्याशी पंचायत समिती कार्यालयाने संपर्क केला नाही . शेवटी पो. नि. चौधरी यांनी पंचायत समिती प्रशासनाचे कान टोचले तेव्हा. गडाख यांच्याशी पो. नि.चौधरी यांनी स्वतः फोनवरून चर्चा करून त्वरीत समक्ष बोलाविले तेव्हा या ग्रामसेविका समक्ष आल्या . आज नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी मध्यस्थी केली नसती तर खुप मोठी दुर्घटना घडली,असती आंदोलन दोन तास चालले,अखेर पंचायत समिती प्रशासनाची नाचक्की झाली . पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी व त्याचे सहकारी पोलिस हवालदार दत्ता सोनवणे, पोलिस मित्र किरण जाधव कपिल तेलुरे यांनी आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांची समजुत काढली, ग्रामसेविका ग्रामसभा घेत नाही मुख्यालयी,रहात नाही,मुख्यालयी करार नामा नाही दलित वस्ती अंतर्गत कामे, नाही या, गोष्टी वर चर्चा करण्यात आली . नांदगाव, पंचायत समिति चे प्रशासन,व पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांची संयुक्त बैठक घेवुन आंदोलनकर्ता दर्शन शिंदे यांना १५ दिवसात कारवाई करु असे,लेखी आश्वासन देण्यात आले.

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.