loader image
[ays_poll id=7]

नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघ आयोजित देशभक्तीपर समूह गीत स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल प्रथम

Aug 16, 2023


नांदगाव – मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने  आयोजित शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय पुरस्काराचे मानकरी संत झेवीयर्स विद्यालय, तर तिसरे बक्षीस छत्रे विद्यालयाच्या संघाने पटकावले. स्पर्धेत गुरू गोविंदसिंग इंग्लिश मिडीयम स्कूल, सरस्वती विद्यालयाच्या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

यंदा स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १० शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. इंडीयन हायस्कूलच्या लोकमान्य सभागृह येथे ही स्पर्धा पार पडली. दुपारी स्पर्धेला सुरुवात झाली. विविध संघ, तबला, हार्मोनियम, ड्रम आदी वाद्यांसह हजर झाले.  मालेगाव येथील गायक आसिफ शेख, राजेश पवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संविधान पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात होते.  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे अध्यक्षस्थानी होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, साहित्यिक संदीप देशपांडे, सोमनाथ घोंगाणे ,संजय मोरे, नरहरी उंबरे, सतिश शेकदार आदी उपस्थित होते. अध्यक्ष अमोल खरे यांनी मनोगतात पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पोलिस निरीक्षक थोरात यांनी पत्रकार संघाने राबवलेल्या या समाजोपयोगी  स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत शहराची सांस्कृतिक ओळख झालेल्या पत्रकार संघाने यासारखे विधायक उपक्रम अव्याहत सुरू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष कार्याबद्दल अशोक बिदरी, संदीप देशपांडे, गणेश केदारे, आम्रपाली वाघ आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेची सुरुवात ‘ हे प्रीत याहा की रीत सदा….’ या गीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फिल्मी आणि नॉन फिल्मी गीतांनी संपूर्ण सभागृह देशभक्तीरसात न्हाऊन निघाले. ‘जय हिंद…’, ‘ये धरती हिंदुस्तान की….’, ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा…’, ‘ही माय भूमी आमची…’, ‘ए वतन तेरे लिये…’, ‘सतरंगी रंगो से प्यारा…’, ‘जयोस्तुते जयोस्तुते…’, या आणि अन्य विविध गीतांनी, संगीत शिक्षक, विद्यार्थी, पालक श्रोते मंत्रमुग्ध झाले. काही स्पर्धकांना पहिल्यांदाच मंचावर गायनाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विजयी संघांना आकर्षक ट्रॉफी, रोख रकमेसह सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उपाली परदेशी यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. निलेश वाघ, उपाली परदेशी, अशोक बिदरी, नाना अहिरे, गणेश केदारे, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, अनिस शेख, प्रज्ञानंद जाधव, रामदास सोनवणे, राजू लहिरे, अनिल आव्हाड, तुषार गोयल, प्रिया परदेशी, रुपाली केदारे, नैवेद्या बिदरी आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आनंद बोथरा यांनी आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
.