loader image
[ays_poll id=7]

श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान च्या वतीने स्वातंत्रदिना निमित्त शहरातून पदयात्रा

Aug 16, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दूस्थानच्या धारकऱ्यानी १५ ऑगष्ट स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पद यात्रेचे आयोजन गुरुवर्य श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली केले . नांदगाव शहरातून हि पदयात्रा काढली पदयात्रेची सुरुवात राष्ट्रध्वज व भगव्या ध्वजाचे पूजन करून श्री. शिवस्फुर्ती मैदान येथून सदर हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य पदयात्रेत परमपवित्र भगवाध्वज व भारतीय राष्ट्रध्वजाच्या नेतृत्वात त्या मागे शेकडो युवक भारत मातेचा जय जय कार वंदे मातरम् श्री.शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय घोषणा देत चालत होते. पद यात्रा ही हुतात्मा चौक या ठिकाणी आल्यावर . वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रगीत म्हणण्यात आले व पदयात्रेचे सांगते वेळी ही पदयात्रेचा उद्देश सांगण्यात आला “हिन्दुस्थानला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली आहेत. परंतु या देशाचा मानबिंदू असणारा राष्ट्रध्वज निश्चित करताना मोठी चूक झालेली आहे. खरं म्हणजे कोणत्याही राष्ट्राचा ध्वज निश्चित करताना त्या राष्ट्राची संस्कृती, परंपरा, धर्म, अध्यात्म, साधुसंत, महापुरुष इत्यादींचा विचार केला जाणे अपेक्षित असते. या सर्वांचे प्रतिबिंब त्या ध्वजात सामावलेले असते. आपल्या हिन्दुस्थानला तर हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, अर्थकारण, अध्यात्म, पौरुष, पराक्रम या सर्वच क्षेत्रांत आपल्या पूर्वजांनी ‘न भूतो न भविष्यति’ अशी कामगिरी करून ठेवलेली आहे. अगदी थोडक्यांत सांगायचे तर व्यास- -वाल्मिकींपासून ते ज्ञानोबा-तुकोबांपर्यंत समृद्ध अशी अध्यात्माची परंपरा लाभलेली आपली भारतभूमी आहे. पराक्रमाच्या बाबतीत राम- -कृष्णांपासून ते शिवछत्रपती- संभाजी महाराजांपर्यंत अत्यंत गौरवशाली परंपरा आपल्याला लाभलेली आहे.म्हणूनच या देशाचा राष्ट्रध्वज हा राष्ट्राच्या अत्यंत प्राचीन संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असणारा, प्रभुश्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्रीशिवछत्रपती यांच्या साम्राज्याचा भगवा झेंडाच असला पाहिजे. तसेच मुख्य करून श्री.विकास शर्मा यांनी सांगितले तरुणांमध्ये देशभक्ती, धर्मभक्ती व स्वातंत्र्य भक्तीची भावना उत्पन्न व्हावी त्यांच्या हृदयात श्रीशिवछत्रपति संभाजीमहाराजांचे अधिष्ठाण रहावे या करिता सदर उपक्रमाणे आयोजन श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नांदगाव विभाग यांनी  केले होते .


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
.