loader image
[ays_poll id=7]

१५ ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनी नाशिक चे भूमिपुत्र श्री सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे समाजाच्या वतीने “समाजभुषण पुरस्काराने” केले सन्मानित…

Aug 19, 2023

हा सोहळा भव्य दिव्य व सुसज्य अश्या वातावरणात पार पडला.
दि.15ऑगस्ट स्वारगेट पुणे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांच्या वतीने गुणवंण विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार वितरण महासोहळा, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला.
प्रथम श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व श्री अमोलजी निवळकर व कु सोहम गुहागरकर यांच्या ऑनलाइन निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यामधे नाशिक जिल्हातील वडनेर भैरव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष शुक्लेश्वर जाधव यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच श्री उमेश रमेश खैर ( गुहागर ), श्री अनिल तुकाराम नरवणकर (पिंपरी चिंचवड ) यांनाही समाजभुषण पुरस्काराने तर श्री कृष्णा रामचंद्र अंबिरकर,(चिखली )यांना समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विषेश गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व गुणवंत गृहिणी सन्मान पुरस्कार यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री कृष्णा अंबिरकर तर प्रमुख उपस्थिती श्री रघुनाथजी (आण्णा) गौडा नगरसेवक , श्री तुकारामजी जाधव ( कोकण वासीय महासंघ पुणे.) संस्थापक अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर, हे समाज संघटित करून सर्वाना एकसूत्रांत बांधण्याचे कार्य अविरत पणे करत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावेळीही सुंदर आयोजन नियोजन केले गेले. उपाध्यक्ष समाजरत्न गजानन बगावडे,यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.सह उपाध्यक्ष अशोकजी शिरकर ,खजिनदार राजेन्द्रजी पडवेकर सौ, सुरेखा साळवी आदी पदाधिकारी व इतर मान्यवर, समाज बांधव या सोहळ्यात उपस्थितीत होते. हा कार्यक्रम फेसबुक च्या माध्यमातून महाराष्ट्र भर लाईव्ह प्रसारीत केला व ऑफलाईन उपस्थिती मधे तर डोळ्याचे पारणें फेडणारा सोहळा बघितल्यावर सर्वांनी मनापासून कौतुक केले.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे देश भक्ती पर गीत,तबला वादन,नृत्य, मंगळागौर गाण्यावर सुंदर नृत्य सादरीकरण केले. विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.समाज संघटित झाला तर सर्वांचाच विविध अंगी विकास होईल. व समाज प्रगतीपथावर गरुड भरारी घेईल. या संस्थेच्या माध्यमातून ही दिग्गज मंडळी हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे वक्तव्य नगरसेवक रघुनाथजी गौडा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे संघटक समाजरत्न श्री संतोष साळवी व सौ जोत्स्ना साळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री मदन व्हालकर यांनी मानले आणि पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली.
” व हा सोहळा समाजाच्या कार्याला गती देणारा व सर्वांच्या अंगात कार्याची ऊर्जा निर्माणकरून बळदेणारा दैदीप्यमान सोहळा ठरला”

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.