नांदगाव सोमनाथ घोगांणे
कांदा हा सर्वसामान्य जनतेचा आहारातील मुख्य घटक असून त्याची देशांतर्गत बाजारपेठेत भाववाढ रोखण्यासाठी आणि पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने आज १९ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले. याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकरी वर्गावर होणार असून सर्वसामान्य जनतेला मात्र या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे.
केद्रं सरकारचा या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उल्पादक संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी जाहीर निषेध केला आहे.