loader image
[ays_poll id=7]

जामदरी येथील आदिवासी कुटूंबीयाना संसारोपयोगी वस्तू भेट

Aug 20, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

तालुक्यातीता जामदरी येथील आदिवासी वस्तीवरील मागील वर्षभरात विविध घटनांमध्ये आदिवासी कुटुंबीयांचे संसार उध्वस्त झाले होते, यामागे विविध कारणांमुळे जळीत घटना होऊन संसार नष्ट झाला होता.
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांनी आज सर्व कुटुंबियांना निवस्थानी पाचारण केले होते. या वेळी उपस्थित सर्व आदिवासी कुटुंबियांना सर्व प्रकारच्या संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या मध्ये सर्व लहान मोठी भांडे, कुकर, गॅस शेगडी, किराणा, गहू, तांदूळ, 2 साड्या, ड्रेस या वस्तूंचा समावेश आहे.
सर्व आदिवासी कुटुंबीयांचा पाहुणचार करून आदराने सर्वांना संसार उपलब्ध करून देण्यात आला.
आमदार सुहास आण्णा कांदे सतत नैसर्गिक आपत्तीचा मध्ये नुकसान झालेल्या कुटुंबियांना संपूर्ण संसार उभा करून कुटुंबप्रमुखाची जबाबदारी निभावत असतात.
या वेळी किरण गवळे व भगवान देशमुख यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे जामदरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहानदादा खान, प्रमोद भाबड, किरण आण्णा कांदे, भावराव बागुल, किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, उज्वालाताई खाडे, रोहिणी ताई मोरे, दीपक मोरे, रमेश मामा काकळीज, सरपंच बाबासाहेब मोरे, भगवान देशमुख, हिरालाल देशमुख, अरुण शेवाळे, कमलेश इनामदार, संतोष म्हस्के, किरण गवळे, लखा पवार, सुरेश चव्हाण तसेच

लाभार्थी सुरेश घुटे, शिवाजी वटाने, दत्तू घूटे, सोमनाथ घुटे, शारदाबाई सुभाष घुटे, छायाबाई दौलत वाघमारे, अनुसाबाई देवराम सोनवणे, सुदाम पवार, देविदास चव्हाण, वाल्ह्याबाई दळवी, छोटू मोरे तसेच रणखेडा येथील अनिल मोरे आदी उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
.