loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न झाली.

Aug 22, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत २७ गावांमध्ये विविध कामे सुरू असून या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, या वेळी बिडीओ श्री गणेश चौधरी संबंधित अधिकारी, सर्व गावांचे ग्रामसेवक तसेच ठेकेदार उपस्थित होते. काम कुठपर्यंत आले, स्थानिक समस्या, इतर अडचणी व कामाचा वेग यावर चर्चा झाली.
आ. सुहास कांदे यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, ग्रामीण भागातील जनतेस तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोणतीही काटकसर न करता काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.

वसंतनगर, चंदनपुरी, कसाबखेडा, चिंचविहिर, रोहिले बु, साकोरा, तळवाडे, न्यायडोंगरी, अनकवाडे रामनगर तांडा, रागुविर तांडा, कासारी इंदिरानगर, पानेवाडी, बेजगाव, वंजारवाडी, कुसुमतेल, माळेगाव कऱ्ह्यात, भार्डी, सावरगाव, कोंढार, नागापुर, जातेगाव, मोहेगाव, ढेकू, बोलठाण, मळगाव या गावात काम सुरू आहे. यामध्ये गावात विहिर, गाव अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था, पंपगृह, पंपिंग मशिनरी, टाकी आदींचा समावेश असणार आहे.
गुरुवार पासून या सर्व गावात भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार असल्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले या वेळी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

गुड शेफर्ड स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलमध्ये स्वराज्याची जणनी राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती व...

read more
🛑 फलक रेखाटन                                       दि. १२ जानेवारी २०२४.      युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

🛑 फलक रेखाटन दि. १२ जानेवारी २०२४. युवा दिन ,स्वामी विवेकानंद जयंती, व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती.

फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक...

read more
रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

रेल्वे ओव्हर ब्रीज शेजारी एक नवीन फ्लाय ओव्हर ब्रीज बनवा मनमाड रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळातर्फे आ. कांदे यांना निवेदन

नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन...

read more
एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

  मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी...

read more
आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही एक चळवळ:- डॉ. भारती पवार

आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी...

read more
.