नांदगाव सोमनाथ घोगांणे
शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात वाढ करावी महिलांना सुरक्षिता द्यावी विमा संरक्षण द्यावे यासह शिपाई पदावर नियुक्ती द्यावी या मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी राज्याचे हेविवेट नेते अन्न पुरवठामंत्री नामदार छगन भुजबळ यांची येवला येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देऊन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात चर्चा केली यावेळी नामदार भुजबळ यांनी हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे यासाठी मी आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करेल असे सकारात्मक उत्तर दिले यावेळीं महिलांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी संगीता संतोष सोनवणे,आशा शरद काकळीज,अलका आयनोर ,रत्ना सोनवणे, संगीता मोकळ आदी महिला उपस्थित होत्या .