loader image
[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिका प्रशासनाचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष ; नागरिकांचे हाल – शिवसेना (ऊबाठा) गटाचे धरणे आंदोलन

Aug 28, 2023

मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असूनही नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व दुर्लक्षामुळे शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मनमाड नगरपालिकेचे प्रशासक चौधरी यांना विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.मनमाड नगरपरिषद सामान्य मनमाडकरांना मुलभूत सुविधा देण्यास कमी पडत असल्याने निष्क्रीय प्रशासनाविरोधात सामान्य जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसाळा असून देखील शहराला मिळणाऱ्या पाण्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मनमाडकरांना सुमारे २२ दिवसानंतर होणारा पाणीपुरवठा योग्य फिल्टरेशन होत नसल्याने अत्यंत दुषीत व निष्कृष्ट दर्जाचे असल्याने संपूर्ण शहरामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या साथीच्या रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून उलट्या, जुलाब आदी आजारांमुळे नागरिक बेजार झाले आहे यामध्ये लहान मुले व वृध्दांची संख्या लक्षणीय आहे या सर्व भयानक परिस्थितीस सर्वस्वी नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. नियमितपणे पाणीपट्टी भरून देखील मनमाड नगरपालिका स्वच्छ पाणीपुरवठा करण्यास सक्षम नसल्याने स्थानिक नागरिक अत्यंत संतापलेले आहेत.
मनमाड शहरात विविध भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, अनेक स्ट्रीट लाईट बंद स्वरूपात आहेत तसेच चंद्रभागा लॉन्स ते भगवान बाल्मिकी स्टेडियम पर्यंत फक्त दाखवण्यापुरते वीजेचे खांब उभारण्यात आले आहे मात्र त्या खांबावर आजपर्यंत स्ट्रीटलाईट लावण्यात आलेले नाही त्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार पसरला आहे.
त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे बेरोजगारी वाढल्याने मनमाड शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे सदर परिसरात अंधाराचा गैरफायदा घेवून कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी मनमाड नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील.
मनमाड शहरातील सर्व गटारांची वेळच्या वेळी साफसफाई केली जात नसल्याने तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये कचरा नेणारी गाडी नियमितपणे येत नसल्याने सर्वत्र पाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनमाड नगरपरिषदेतील आरोग्य विभाग व मलेरिया विभागाच्या दुर्लक्षामुळे तसेच नियमितपणे औषध फवारणी होत नसल्याने शहरातील सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार, भाऊ पाटील,दिनेश केकाण, कैलास भाबड,अनिल दराडे, विनय आहेर, लियाकत शेख,संजय कटारिया, सनी फसाटे, इरफान शेख, भैया घुगे आदींसह शिवसेना पदाधिकारी,मनमाडकर नागरिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.