loader image
[ays_poll id=7]

श्रावणी सोमवार निमित्ताने श्री नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रौत्सव

Aug 28, 2023


योगेश म्हस्के
मनमाड : श्रावणी सोमवार निमित्ताने मनमाड येथुन जवळच असलेल्या श्री क्षेत्र नागापुर नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मनमाड पासुन जवळच असलेल्या मनमाड -नांदगाव रोडवर नागापूर येथे असणारे श्री नागेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत पुरातन आणि पवित्र ठिकाण , येथील श्री नागेश्वर महादेव मंदिर हे अत्यंत पुरातन असुन या मंदिराचा रामायण काळाशी देखील संबंध असल्याचे बोलले जाते. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि शांत असुन मंदिरा समोर भव्य सभामंडप आहे. मंदिर परिसरात अनेक देवतांची देखील मंदिरे आहे.मंदिराच्या बाजुला पुरातन असे पाण्याचे कुंड असुन त्याचे देखील खुप महत्व आहे.दरवर्षी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्री निमित्ताने येथे भव्य यात्रा भरत असते , मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली असुन , मंदिरामध्ये दर्शनासाठी शेकडो भाविक हजेरी लावत असतात , यंदाच्या वर्षी देखील श्री नागेश्वर मंदिर येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन , मंदिर परिसरात प्रसाद , नारळ , बेल-फुले , खेळणी , पाळणे , खाद्य पदार्थ आदी प्रकारचे दुकाने लावण्यात आली. आज मात्र श्रावणी सोमवार निमित्ताने मंदिर परिसरात कमी प्रमाणात भाविकांची गर्दी दिसली , यात्रेतील अनेक दुकानदार हे ग्राहकांची वाट बघताना दिसत होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.