आज सायंकाळी सात वाजे पासून मनमाड शहरात अचानक मुसळधार पाऊस बरसला. ह्या पावसाळ्यातील पहिला मुसळधार पाऊस आज खऱ्या अर्थाने मनमाड करांनी अनुभवला. सायंकाळी सात पासून सुरू झालेला हा पाऊस सुमारे तास भर बरसला. रक्षाबंधन निमित्ताने राख्यांच्या थाटलेल्या दुकानदारांना अचानक बरसलेल्या या पावसाचा फटका बसला. ह्या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच हातभार लागला असून पावसा अभावी शेतातील पिके करपून शेतकऱ्यांनाही पाणी नसल्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लेट पण थेट पडलेल्या ह्या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून आता तरी वरुण राजाने आपली कृपादृष्टी कायम ठेवावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
बघा व्हिडिओ-मनमाड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा
मनमाड : योगेश म्हस्के मनमाड शहरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा...










