loader image

अखेर नाशिक जिल्हा बँक पूर्व पदावर येण्यास सुरुवात…                

Apr 6, 2024


  प्रचंड राजकीय हस्तक्षेप नियम डावलून कर्ज पुरवठा ठप्प झालेली वसुली, आणि प्रचंड भ्रष्टाचारामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तोटा वाढून एनपीए वाढल्याने बँकेचा परवाना धोक्यात सापडला होता कोणत्याही क्षणी बँक बंद पडून हजारो ठेवीदारांचे 2100 कोटी याहुन अधिक रुपयांच्या ठेवी परत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता अशा परिस्थितीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाकडे बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या आलेल्या तक्रारीवरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून 2022 पासून प्रयत्न सुरू केले पुढे ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण, वस्त्र त्याग आदोलन,इत्यादी आंदोलने करून सहकार खात्यास व जिल्हा बँकेच्या प्रशासनाला जेरीस आनून ठेवीदारांच्या ठेवी समन्यायी पद्धतीने वाटप करण्याचे धोरण ठरविण्यास भाग पाडले,या आंदोलन काळात अनेक ठेवीदारांच्या ठेवी काही अंशी परत मिळवून देण्यात आंदोलन यशस्वी झाले आंदोलनकर्त्यांनी यावर समाधान न मानता माहिती अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढून त्यातील लिकेजेस आणि लुपहोल्स बंद केली अशाच एका माहिती अधिकार अर्जावरील 150 दिवसांनी मिळालेल्या माहितीवरून निदर्शनात आले की बँक स्थापन झाल्यापासून ते आजतागायत बँकेत शिरलेल्या राजकीय गिधाडांनी नवीन एकही नवीन सभासद (शेअर्स) देण्यात आला नव्हता ,परंतु वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन सभासद घेण्यात यावे असा ठराव झालेला असताना तो ठराव नवीन आलेले प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांच्या निदर्शनात आणून दिला प्रशासकांनी इमानी ईतबारे पुढील सोपस्कार पार पाडून अखेर सभासद नोंदणी सुरू केली परंतु अशा परिस्थितीत बँकेवर विश्वास ठेवून कोण शेअर्स विकत घेईल अशी शंका निर्माण झाली होती यावर प्रशासकांनी आंदोलन करत्यानाचं जास्तीत जास्त सभासद नोंदणीचे आवाहन केले सदर आव्हान स्वीकारून आंदोलनकर्त्यांनी विविध समाज माध्यमात मधून शेअर्स सभासद नोंदणीचे आवाहन करून सभासद नोंदणी सुरुवात केली याच दरम्यान बँकेच्याच अनेक माजी संचालकांनी आंदोलन कर्त्यांना हिनवले की बँकेला कुलूप लागणार आहे,बँक बुडणार आहे तुम्ही जनतेला शेअर्स विकत घेण्याचे आवाहन करून तुम्ही त्यांची फसवणूक करीत आहात हे प्रकरण तुमच्या अंगलट येईल अशा प्रकारे बँकेची व आंदोलनकर्त्यांची बदनामी सुरू केली परंतु जनतेने बँकेवर व संघटनेवर विश्वास ठेवत शेअर सभासद नोंदणी सुरू ठेवली आज मीतीस जिल्हा बँकेत 16 हजार नवीन सभासदांचे 16 कोटी रुपये जमा झाले आहेत,आणी सन 2016 नंतर प्रथमचं जिल्हा बँकेला 59 कोटींचा नफा प्राप्त झाला आहे,या सर्व प्रक्रियेत बँकेत नवीनच आलेले प्रशासक श्री प्रतापसिंह चव्हाण व बँकेच्या सेवकांनी प्रामाणिकपणे कोणत्याही दबावला बळी न पडता वेगवेगळ्या उपाययोजना राबवून शासनाशी योग्य तो समन्वय साधल्याने बँक पूर्वपदावर आणण्यास यशस्वी झाले आहेत त्यांची ख्याति अशी आहे की त्यांनी त्यांच्या सेवाकाळात आजपर्यंत बुडीत गेलेल्या चार जिल्हा बँकेंना जीवनदान दिले आहे पूर्वपदावर आणले आहे त्यांच्या हातात आज बँक सुरक्षित आहे येणाऱ्या काळात ग्रामीण भागाची मातृसंस्था असलेली आशिया खंडात नंबर एक असलेली आपली जिल्हा बँकेत लवकरच पुन्हा एकदा सर्व व्यवहार सुरळीत होतील या निमित्ताने आम्ही आपणास पुन्हा जाहीर आवाहन करतो की नवीन सभासद (शेअर्स) नोंदणी बंद होण्यापूर्वी शेअर्स नोंदणी करून घ्यावी या यशस्वी आंदोलनात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे भास्कर झाल्टे ,भीमराज लोखंडे,विष्णु चव्हाण,विशाल वडघुले,भगवान सोनवणे, रामदास दुभासे इत्यादी सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.