loader image
[ays_poll id=7]

आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

Sep 5, 2023


आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यातर्फे आज मनमाड येथील संपर्क कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता .
दुष्काळाची परिस्थिती पाहता आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आणि मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध सुविधांचे लोकार्पण करण्याचे आयोजन केले, याचाच एक भाग म्हणून मतदारसंघातील तरुणांसाठी नौकरी ची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या मध्ये रिंग गेअर अक्वा, शारदा मोटर्स, बजाज सन्स, हिताची जळगाव, एम डी इंडस्ट्रीज, एल आय सी, महिंद्रा अँड महिंद्रा, टपारिया टूल, सतीष टोय, वैष्णवी ऑटो, किंप क्लॉथ, आर्ट रबर, व्ही आय पी, नाशिक, सिन्नर येथील 30 हून अधिक कंपनीचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यास मतदारसंघातील तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नौकरी करिता मुलाखत दिली, यावेळी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.
1133 उमेदवारांनी नोकरीसाठी मुलाखत दिली तर यातील 776 मुलांना तात्काळ ऑफर लेटर ( joining letter) देण्यात आले.
संपूर्ण मतदारसंघातून या ठिकाणी तरुण तरुणी मुलाखतीसाठी आलेले होते.
या वेळी संपर्क कार्यालय येथे चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.
युवासेना जिल्हाध्यक्ष फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उप जिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, बबलू पाटील, सौ.संगीता बागुल, विद्या जगताप, पुजा छाजेड यांच्या हस्ते प्रत्येकाला ऑफर लेटर देण्यात आले.
या मेळाव्याचे नियोजन रवी देवरे सरचिटणीस औद्योगिक कामगार सेना यांनी केले होते. या वेळी बोलतांना याबपुढेही आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नांदगाव, मनमाड, मालेगाव येथील संपर्क कार्यालयात नौकरी नोंदणी सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांना नाशिक येथे बोलावले जाणार असून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.
या वेळी युवासेना शहराध्यक्ष योगेश इमले,आसिफ पहिलवान, गालिब शेख, अमीन पटेल, आझाद पठाण, आमीन शेख, राकेश ललवाणी, किशोर लहाने, अंकूश कातकडे, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, निलेश ताटे, अज्जू शेख, रमेश दरगुडे, विशाल सुरवसे, लोकेश साबळे, सिद्धार्थ छाजेड, अजिंक्य साळी, अज्जू पठाण, स्वराज देशमुख, रिशिकांत आव्हाड, धनंजय आंधळे, स्वराज वाघ, अमोल दंडगव्हाळ, प्रमोद अहिरे, मन्नू शेख, प्रमोद राणा, कुणाल विसापूरकर सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, शहर संघटक नीतू परदेशी, सावित्री यादव उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्लाची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन मध्ये वरिष्ठ महिला संघात निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन  यांच्या वरिष्ठ महिला आमंत्रिताच्या ( जिल्हास्तरीय ) टि-20...

read more
फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

फाल्गुन मास संकष्ट चतुर्थीनिमित्त गुरुवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
.