loader image
[ays_poll id=7]

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलींचा संघ विजयी

Sep 7, 2023


मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाआतील मुलीच्या संघाने विजय संपादन केला. मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्मिताताई हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे, युवा नेते अद्वयआबा हिरे, विश्वस्त मा. संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन. निकम, क्रीडा शिक्षक श्री महेंद्र वानखेडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

जय भवानी व्यायाम शाळेत १७ व १९ वर्षाआतील मुला मुलींच्या शासकीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित शासकीय...

read more
के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड...

read more
आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली गांगुर्डे व करुणा गाढे यांना सुवर्णपदक

स्वामी रामानंद विद्यापीठ नांदेड आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन राजीव गांधी...

read more
.