loader image
[ays_poll id=7]

प्रग्यानच्या चाकांनी चंद्राच्या मातीवर उमटवला अशोकस्तंभ व इस्त्रोचा लोगो…….. आणि सातबाराचा उतारा

Sep 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगावची सुकन्या पुजा नारायण दंडगव्हाळ हिचा इस्त्रोच्या चांद्रयान मोहीमेत सहभाग तिच्याच शब्दात

धूळ उडाली आणि उत्सुकता ताणली गेली. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर वातावरण स्वच्छ झाले. रोव्हरचे दार उघडून आमचा प्रग्यान खाली उतरला. त्याक्षणी खूप खूप मस्त वाटल.माझं, माझ्या टीमच काम अखेर चंद्रावर पोहोचल होत. डोळ्यांमधून आनंदाश्रू ओघळले. त्याक्षणी पप्पांची जबरदस्त आठवण झाली. आयुष्यात वेगळ करून दाखव… ही त्यांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान मनात दाटून आले.
आता पुढचा क्षण अजून भावनिक होता. म्हणतात ना बाळाचे पाय… तसे प्रग्यान हे आमचे बाळच आहे…..चाकाच्या प्रत्येक फेरी बरोबर,त्यावर कोरलेले अशोकस्तंभ आणि इस्रोचा लोगो, पुढच्या चौदा दिवसात, चंद्राच्या मातीवर आपले शेकडो ठसे उमटवणार होते. तो क्षण आला….प्रग्यानची चाके चंद्रभूमीवर फिरू लागली पावला गणिक ठसे उमटवत जातांना भारताचा सातबारा तयार होत गेला… इतिहासाचा नवा अध्याय लिहीला गेला. चाकावरील लोगोचे डिझाईन व इतर उपकरणे बनविण्यात आमचा सहभाग होता. ते टीम वर्क होते. बंगलोरस्थित इस्त्रोच्या इमारतीच्या खिडकीतून दिसणारा चंद्र आणि आमच्या समोर लावलेल्या मोठ्या स्क्रीन मध्ये दिसणारे रोव्हर आणि प्रग्यान… हे दृश्य बघताना आम्ही शास्त्रज्ञ हरखून गेलो होतो.
पप्पांना फोन लावला….. तो आयुष्यातला आनंदाचा परमोच्च क्षण होता. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर मी खासगी कंपनीतली नोकरी सोडून इस्रो मध्ये दाखल झाले होते. त्याचे सार्थक झाले. आयटीआय झाल्यावर इस्रोत नोकरी करत असतांना रात्रीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन इंजिनियरिंग मधला डिप्लोमा पूर्ण केला. आज इस्रोमध्ये मी टेक्निकल असिस्टंट पदावर आहे. वडील नारायण दंडगव्हाळ यांच्या आयुष्यातला बहुतांश काळ नांदगाव मध्ये गेला. त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. अशी माहिती पूजा यांनी दिली.
इस्रोत काम करणे कठीण असते. प्रत्येक तीन वर्षानंतर इंटरव्ह्यू होतो. १५ जणांची टीम इंटरव्ह्यू घेते. ड्रॉइंग, डिझाईन, ३ डी मॉडेलिंग, फँब्रीकेशन, व्हँक्युम, टेस्टिंग अशा विवध टप्यातून गेल्यावर अंतिम मॉडेल तयार होते. पदोन्नती कामाशी, कार्यक्षमतेशी सलग्न असते हे महत्वाचे आहे.
चांगला अभ्यास करा, नाविन्याचा ध्यास घ्या, खूप काम करा, फळ व आनंद नक्कीच मिळेल असे शेवटी पूजा दंडगव्हाळ(यू. आर. राव सँटेलाईट सेंटर (ISRO) यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन

मध्यप्रदेशातील इंदोर येथील पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव आणि पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय...

read more
बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

बघा व्हिडिओ – इसापूर येथे विहिरीत पडला बिबट्या – वन विभागाने पिंजरा टाकून पकडले

येवला तालुक्यातील विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला....

read more
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला संप – बळीराजा समोर मोठे संकट

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला संप – बळीराजा समोर मोठे संकट

मनमाड -नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या वसमस्यांवर काल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या...

read more
शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी एजाज रेहमान शाह यांची नियुक्ती

शिवसेना अल्पसंख्यांक विभाग नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी एजाज रेहमान शाह यांची नियुक्ती

एजाज रहमान शहा यांची शिवसेना अल्पसंख्यांक नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली...

read more
मनमाड शहराचे आराध्य  दैवत प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

मनमाड शहराचे आराध्य दैवत प्रथम मानाच्या श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना
पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्री...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी च्या शेख, निते, बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट अंडर 14 संघाच्या संभावित यादीत निवड

भूमी क्रिकेट अकॅडमी च्या शेख, निते, बागुल यांची नाशिक जिल्हा क्रिकेट अंडर 14 संघाच्या संभावित यादीत निवड

मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु हसन शेख, गौरव निते व राजरत्न बागुल यांची नाशिक जिल्हा...

read more
.