Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथे श्री बाबा रामदेव अवतार दीन उत्साहात साजरा करण्यात आला.

Sep 18, 2023

 

श्री बाबा रामदेव पीर यांचा अवतार दिन नांदगाव गुप्ता लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बाबा रामदेव भक्त परिवार तर्फे जम्मा जागरण चे आयोजन करण्यात आले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे तसेच नगराध्यक्ष राजेश जी कवडे यांनी याप्रसंगी उपस्थिती लावली.
भादवा सुधी दूज श्री बाबा रामदेव जी जन्मोत्सव निमित्त श्री बाबा रामदेव भक्त मंडळ तर्फे सायंकाळी पाच वाजता गांधी चौक येथून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली सायंकाळी ६ वाजता महाआरतीची आयोजन करण्यात आले तसेच रात्री ९ वाजता जन्मोत्सव व अमृत कथा म्हणजेच जम्मा जागरण चे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी रिती प्रदीप गुप्ता (सपत्निक) व आमदार सुहास अण्णा कांदे राजेशजी कवडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी बाबा रामदेव भक्त मंडळातर्फे आमदार सुहास अण्णा कांदे राजेशजी कवडे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात सण उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमात सतत उपस्थिती लावणारा आमदार आम्हाला मिळाल्याचा खूप आनंद आहे असे ज्योती प्रसाद अग्रवाल यांनी मत व्यक्त केले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या मनोगतात श्री बाबा रामदेव भक्त मंडळाने केलेल्या मागणीनंतर भविष्यात श्री बाबा रामदेव यांच्या मंदिरासाठी दहा लाख रुपये निधी देणार असल्याचा जाहीर केले.
बाबा रामदेव यांना देशातील अनेक समुदाय इष्टदेव म्हणून पुजतात त्यांना भगवान कृष्णाचा अवतारही मानले जाते हिंदू महिन्याच्या भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी बाबा रामदेव अवतार दिन म्हणून साजरा केला जातो.
या प्रसंगी ज्योती प्रसाद अग्रवाल अंकुश सुराणा, लालू दरडा ,जितू गुप्ता, डॉक्टर विशाल पारख, हर्षल खीलोसिया, पप्पू भटेवरा, प्रदीप गुप्ता , डॉक्टर परितोष गुप्ता , सचिन फोफलीया, केतन करवा, आर्य फोफलीया, शुभम अग्रवाल, दिनेश ओचानी, लक्ष्मीनारायण शर्मा, संजय भावसार तसेच मोठ्या संख्येने बाबा रामदेव भक्त उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास  दिली क्षेत्र भेट.

अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास दिली क्षेत्र भेट.

    अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सरस्वती विद्या मंदिर हायस्कूल च्या विध्यार्थ्यांनी मनमाड...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]