loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश’

Sep 18, 2023


अभियान येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘ मेरी माटी मेरा देश ‘ हा उपक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी स्वतःच्या गावातील आणलेली माती अमृत कलश मध्ये एकत्रित करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी व स्वयंसेवकांना प्राचार्य डॉ सुभाष निकम यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या देशाविषयी आपल्यामध्ये देश प्रेम,कर्तव्य तत्परता निर्माण व्हायला हवी. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी एस देसले, नॅक कॉर्डिनेटर डॉ. मिलिंद आहिरे, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे, कुलसचिव समाधान केदारे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा कविता काखंडकी, डॉ. विठ्ठल नजरधने तसेच विद्यार्थी रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.