loader image
[ays_poll id=7]

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मोर मृत्युमुखी

Sep 18, 2023

येवला तालुक्यातील कातरणी व चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु शिव शिवरस्त्या लगत राहत आसलेले
श्री भाऊसाहेब बाळा कदम कातरणी यांच्या गट नंबर 59 मध्ये आज दि. 18/09/23 रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोन कुत्र्यांच्या हल्ल्यात लांडोर जखमी झाले. कुत्र्यांनी त्याचा एक डोळा निकामी केला मोराच्या सर्वांगावर मोठ्या प्रमाणात चावा घेऊन जखमी केले होते. सोमनाथ यांनी ही माहिती सामाजिक कार्यकर्ते निसर्ग प्रेमी भागवत झाल्टे कातरवाडीकर यांना दिली असता झालटे यांनी वन विभाग कर्मचारी वनरक्षक सोनाली वाघ मॅडम चांदवड यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली त्यांनी त्वरित आपले वनविभाग कर्मचारी भाऊसाहेब झाल्टे व बाळू सोनवणे यांना पाचारण करत लांडोर मोराला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी तळेगांव येथील शासकीय रुग्णालयात आणले परंतु उपचारा दरम्यान मोराचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली
त्या ठिकाणी भाऊसाहेब कदम अंकुश रसाळ रवी कदम समाधान गोजरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मोकाट श्र्वानाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा कारण ते इतके हिंस्र झाले आहे की माणसावरती पाळीव प्राण्यांवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत आहे त्यामुळे यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी झाल्टे यांनी केली आहे

अजून बातम्या वाचा..

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा व्यवहारे, कृष्णा व्यवहारे, मेघा आहेर, साईराज परदेशी, प्रशिक्षकपदी प्रवीण व्यवहारे यांची निवड

मनमाड - चेन्नई येथे होणाऱ्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स साठी आकांक्षा किशोर व्यवहारे,कृष्णा...

read more
दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी

मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम...

read more
बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा

विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम...

read more
.