loader image

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

Sep 25, 2023


मनमाड – शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचा वाढदिवसानिमित्त मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या बुधलवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर व पारीचारिकांना आरोग्यदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धात्रक यांनी वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र संस्थेतर्फे लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला.यावेळी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पवन राऊत,डॉ.सुहास पवार, डॉ. फईम कुरेशी,डॉ जिकरा फारुकी , परिचारिका लक्ष्मी जाधव व मदतनीस वैशाली जगताप यांचा शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.प्रवीण शिंगी व डॉ. संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, शहरप्रमुख माधव शेलार,सुनील पाटील, ऍड.सुधाकर मोरे, अशोक सानप,विजय मिश्रा, प्रमोद पाचोरकर, रईस फारुकी, गोपी पुरे उपस्थित होते.जावेद मन्सुरी यांनी सूत्रसंचालन केले.
मिलींद सामाजिक संस्थेचे प्रमुख विलास ( पिंटू ) कटारे,विकी पगारे, पवन पवार, मुकुंद एळींजे ,कैफ तांबोळी ,अनुराग कटारे, दादा पगारे, बॉबी गांगुर्डे, बाळा उबाळे, विजय उगले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.