loader image
[ays_poll id=7]

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत अमृत कलश रॅली

Sep 30, 2023

मनमाड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक नागरिकात देशभक्ती जागृत व्हावी, या हेतूने ‘मेरी माटी, मेरा देश’ हे राष्ट्रीय अभियान सर्वदूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राबविले जात आहे. त्यानुसार मनमाड शहरातही नगर परिषदेतर्फे हे अभियान राबविले जात आहे.

कवी रबिन्द्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटी संचलित कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कुल व ज्यु. कॉलेजच्यावतीने या अभियानांतर्गत नुकतेच अमृत कलश रॅलीचे आयोजन करण्यात आले. यात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी सहभाग घेतला. या रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक व्यवहारे, शाळेचे विश्वस्त श्री धनंजय निंभोरकर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी तसेच शिक्षक श्री विशाल झाल्टे, श्री प्रवीण आहेर, विलास कैचे, शहनाज पठाण आणि सौ. गौरी जोशी यांनी सहभाग घेतला.

या रॅलीमध्ये मेरी मिट्टी मेरा देश व मिट्टी को नमन वीरो को वंदन या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सिद्धिविनायक नगर, पल्लवी मंगल कार्यालय परिसर, फुले चौक, चिंतामणी मंगल कार्यालय, रविकिरण अपार्टमेंट, शिवाजीनगर नंबर दोन, वसंत हाउसिंग सोसायटी या परिसरात मेरी या कार्यक्रमांतर्गत घराघरातून माती व तांदुळ गोळा करण्यात आले. यावेळी ‘मेरी माटी, मेरा देश’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. परिसरातील नागरिकांनीसुद्धा अमृत कलशात माती टाकून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर आणि प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांचे मार्गदर्शन तर श्री. राजेश सोनवणे, सौ. स्वाती बिडवे आणि सौ. वैशाली रसाळ यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.