बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक.मनमाड विभाग येथे चंद्रशेखर पगारे आणि शितल गायकवाड,मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शना खाली आज अंगणवाडी सेविकाताई यांनी पोषण अभियानाची सागंता करून बालकाच्यां सर्वागिण विकासासाठी वाढ आणि विकास याविषयी नाटिका साजरा करण्यात आली..
बालकांच्या वाढी सोबत विकास ही महत्वपुर्ण आहे ..त्यामुळे घरातील सदस्यांनी आपल्या बालकांसाठी वेळ द्यायचा.बालकाला विकत खेळणी नको आहे तर खेळ हवा आहे. तो पालकांनी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून मुलांच्या विकासाच्या निगडीत असलेल्या गरजा पुर्ण करायच्या आहेत..मुलांच्या सर्वागिंण विकासास चालना मिळण्यासाठी प्रयत्नशिल रहायचे आहे. तसेच स्वच्छतेचे महत्व नाटीकाव्दारे सांगण्यात आले..*स्वच्छता असे जेथे ,आरोग्य वसे तेथे*. सर्वानी आपली स्वतःची आपल्या घराची तसेच घराच्या आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवायचा आहे.याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.















