loader image

जागतिक संशोधन क्षेत्रात भारतीयांचा वाटा महत्त्वाचा. डॉ. बी एस यादव

Oct 1, 2023


मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संशोधनावर आधारित”अविष्कार”(Avishkar Competition) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. बी एस यादव (के जे एस महाविद्यालय कोपरगाव) उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून जागतिक संशोधन क्षेत्रामध्ये भारताचा वाटा महत्त्वाचा आहे, संशोधन हा उच्च शिक्षणातील महत्त्वाचा घटक आहे असे मत व्यक्त केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला समाजाचा अविभाज्य घटक मानून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विश्लेषण क्षमतेचा विकास करावा व एखाद्या घटनेच्या पाठीमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करून एक जागरूक संशोधक होण्याचा सल्लादेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची क्षमता असते फक्त त्या क्षमतांना योग्य वळण देणे गरजेचे आहे तसेच संशोधन हे मानवाच्या प्रगतीसाठी असावे असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केले याप्रसंगी स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथील प्राचार्य डॉ. बाळासाहेब राहाणे म.स.गा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी टी सावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील संशोधक समन्वयक डॉ. जे डी वसईत यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. गणेश गांगुर्डे यांनी तर आभार शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक रोहित शिंदे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

.