loader image

राशी भविष्य : ५ ऑक्टोबर २०२३ – गुरुवार

Oct 5, 2023


मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवे परिचय होतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. जिद्दीने कार्यरत राहाल. वादविवाद टाळावेत.

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : हितशत्रूंचा त्रास संभवतो. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. सुसंवाद साधाल.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.


अजून बातम्या वाचा..

.