मांडवड येथे गारपीट व नुकसान अनुदानासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाची आमदार कांदे यांच्या मध्यस्थीने सांगता झाली.
मांडवड येथील ग्रामस्थ मागील वर्षी झालेल्या गारपीट मध्ये झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावे या मागणीसाठी ५ दिवसापासून उपोषणास बसले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी उपोषणाची दखल घेत संबंधित अधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांना उपोषणस्थळी उपोषण करते यांना भेटण्याच्या सूचना केल्या असता शनिवारी दुपारी गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी मोरे, तहसील चे काकडे तसेच संबंधित ग्रामसेवक , तलाठी, मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह माजी जि.प.गट नेते राजाभाऊ पवार, जिल्हा प्रमुख किरण देवरे, राजाभाऊ देशमुख, संजय आहेर यांनी उपोषण कर्ते यांची भेट घेतली.
यावप्रसांगी येत्या 8 दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले. यानंतर लेखी निवेदन स्वीकारून उपोषणाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी उपोषण कर्ते विष्णू थेटे, गडाख, विट्ठल आबा आहेर, अशोक निकम, सागर आहेर, नरहरी थेटे, दत्तू निकम, विजय आहेर, आदींसह
शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

