महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे ग्रुपच्या विश्वस्त संपदा हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनमाड येथील प्रथितयश स्त्रीरोग तज्ञ डॉ.पुनम राजपूत यांचे प्रमुख उपस्थितीत आरोग्य संपदा योजने अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ.पूनम राजपूत यांनी या आरोग्य शिबिरात विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक आरोग्याच्या बाबतीत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.विद्यार्थिंनींना आपल्या नियमित शारीरिक स्वच्छतेची काळजी घेण्याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.आपली भारतीय संस्कृती,आपले आचार, विचार व विहार या विषयीची जाणीव त्यांनी विद्यार्थिनींना करून दिली. त्याचबरोबर स्त्री विषयक जे नवनवीन आरोग्य समस्या उद्भवत आहेत त्या संदर्भात त्यांनी विस्तृत विवेचन करून आपले आरोग्य उत्तम कसे ठेवता येईल याबाबतीत त्यांनी खूप उपयुक्त अशा सूचना दिल्या.विद्यार्थिनी या भविष्यकाळातील माता आहेत म्हणून पुढची निरोगी पीढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे .याबाबत त्यांनी गांभीर्याने विचार,करावा असे निक्षून सांगितले. मोबाईलचा अतिरेकी वापर मानसिक व शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरत आहे व यामुळेच विद्यार्थिनींची जीवनशैली बिघडून गेलेली आहे. मोबाईलचा योग्य वापर करून आपण आपले करिअर व जीवन उत्तम पणाने जगू शकतो यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन ही गोष्ट स्पष्ट केली. शिबिरातल्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमांत अनेक विद्यार्थ्यांनींनी आपल्या आरोग्य समस्या मांडल्या. डॉ. पूनम राजपूत यांनी त्यांच्या शंकाचे निरसन करून त्यांच्या मनातील भीती दूर केली.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या श्रीमती ज्योती पालवे होत्या.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुलींना उत्तम जीवन जगण्यासाठी उत्तम आहार विहार व विचार आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. प्रास्तविक महिला विकास कक्षाच्या अध्यक्ष प्रा. कविता काखंडकी, पाहुण्यांचा परिचय डॉ. आरती छाजेड तर आभार प्रदर्शन श्रीमती सुरेखा राजवळ यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.अलका नागरे यांनी केले.
याप्रसंगी मनमाड उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर श्रीमती जोशी या देखील उपस्थित होत्या. हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ. जे.वाय.इंगळे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, राज्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष प्रा. संदीप ढमाले यांचे या शिबिराच्या आयोजनासाठी उत्तम सहकार्य लाभले. महिला समितीच्या सर्व सदस्यांनी याप्रसंगी सक्रिय सहभाग नोंदवला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या व उत्तम प्रतिसाद या शिबिराला मिळाला.

राशी भविष्य : २९ सप्टेंबर २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....