loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व ‘वाचन प्रेरणा दिन’ प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा

Oct 21, 2023

मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व ‘वाचन प्रेरणा दिन’ प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कुमारी समीक्षा कांबळे हिने, भारताचे माजी राष्ट्रपती मा.डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आपल्या भाषणातून थोडक्यात परिचय करून दिला. तर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचनाबद्दलचे सुविचार सांगून विद्यार्थ्यांमध्ये वाचनासंदर्भात उद्बोधन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रेया खर्डे हिने केले. या दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तासभर शालेय ग्रंथालयातील पुस्तकाचे वाचन करुन हा दिन खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहात साजरा केला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.