मनमाड – येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती मा. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व ‘वाचन प्रेरणा दिन’ प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात कुमारी समीक्षा कांबळे हिने, भारताचे माजी राष्ट्रपती मा.डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आपल्या भाषणातून थोडक्यात परिचय करून दिला. तर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम यांनी आपल्या भाषणातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचनाबद्दलचे सुविचार सांगून विद्यार्थ्यांमध्ये वाचनासंदर्भात उद्बोधन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी श्रेया खर्डे हिने केले. या दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तासभर शालेय ग्रंथालयातील पुस्तकाचे वाचन करुन हा दिन खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहात साजरा केला.
पत्रकार विद्यापीठासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी सोबत राहू — किरण नाईक मनमाडमध्ये पत्रकार गुणगौरव व जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
मनमाड (प्रतिनिधी) : पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार विद्यापीठ उभारण्यासाठी नाशिक येथे जागा उपलब्ध...











