loader image
[ays_poll id=7]

“शारदीय नवरात्रोत्सव”आज सातवी माळ
योगेश म्हस्के

Oct 21, 2023


मनमाड : आज शारदीय नवरात्री उत्सवाचा आज तिसरा दिवस , शहरातील अनेक देवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

मनमाड येथील आय.यु.डी.पी. परिसरातील भवानी चौक येथील भवानी टेंट हाऊस अँड डेकोरेटर्सचे संचालक श्री पंदरकर परिवार यांच्या येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर येथे देखील शहरातील भाविक-भक्त भवानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करत आहे , श्री पंदरकर परिवार यांनी आपल्या घरालाच सुंदर अशा मंदिराचे रूप दिले आहे. मंदिरा संबंधित माहिती देतांना पंदरकर परिवाराचे सदस्य श्री गोरख पंदरकर यांनी सांगितले की साधारण बावीस वर्षांपुर्वी त्यांना आपल्या घराचे काम करत असताना त्यांना जमीनी मध्ये एक देवीच्या आकाराची शिळा सापडली होती ,त्यांनी त्या शिळेची आपल्या घराजवळच स्थापना करून त्याची सेवा करण्यात सुरवात केली. काही दिवसांनी त्याच शिळेला मुर्तीकाराकडुन सुंदर अशा कुलस्वामीनी तुळजाभवानी मातेचे स्वरूप देण्यात आले आहे. काही वर्षांपुर्वी श्री पंदरकर परिवाराने आपल्या घरालाच मंदिराचे रूप देऊन सुंदर असे मंदिर बनवुन त्या मंदिरात श्री तुळजाभवानी मातेची स्थापना केली आहे.

यंदाचा नवरात्रीच्या काळामध्ये मंदिराला आकर्षक अशी विद्युतरोषणाई करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.पहाटे पाच वाजेपासुनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते , मंदिराला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट शहरातील भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
.