loader image
[ays_poll id=7]

दिवाळी आनंदाची – राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप

Nov 1, 2023

आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, या उक्ती प्रमाणे दरवर्षी मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळी आनंदाची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही डोणगाव रोड येथील आश्रम शाळेत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी दीपक गोगड यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन भविष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले व सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव सौ.वैशाली पगारे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष सौ.अपर्णाताई देशमुख, राष्ट्रवादीचे पदाधिकारी योगेश जाधव, अक्षय देशमुख, अमोल गांगुर्डे, फिरोज शाह, युवती अध्यक्ष कोमल निकाळे, हर्षदा तावडे, स्थानिक संचालक श्री.वाल्मिक कदम, माधवभाऊ शेलार, आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे नंदकिशोर पगार, नामदेव शेवाळे, अशोक सुलाणे, वसंत कामडी, श्रीमती चंद्रकला सोनवणे, अलका भवर, अधीक्षक दत्तात्रय पवार, चिंतामण पगारे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे श्रीराज कातकाडे व आनंद बोथरा यांनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.