loader image
[ays_poll id=7]

नाशिक येथे 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान संपन्न होणार महाशिवपुराण !

Nov 7, 2023

नाशिक येथे आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात येत आहे. या नियोजन संदर्भात शासकीय विश्रामगृह नाशिक येथे आढावा बैठक घेण्यात आली. 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान ही कथा नाशिक येथे आयोजित केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने, सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. या सोहळ्यास भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लागणार असून त्या संदर्भात सुयोग्य नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शासकीय विश्रामगृह नसीम येथे झाली. यावेळी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील आखाड्यांचे महंत देखील उपस्थित होते.

श्री. मिश्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथेला असंख्य भाविक उपस्थित राहतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता कथेसाठी जागा, भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत करण्यात येणार आहे. यावेळी खा. हेमंत आप्पा गोडसे, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.