loader image
[ays_poll id=7]

डॉक्टर असोसिएशन नांदगाव तर्फे धन्वंतरी पुजन संपन्न

Nov 11, 2023

नांदगाव – मारुती जगधने
धन्वंतरी दिनाचे औचित्य साधीत डॉक्टर असोसिएशनने गोदावरी हॉस्पिटल येथे धन्वंतरी पुजन आयोजित करण्यात आले होते .
यावेळी सविचार सभा घेण्यात आली. यात सर्व डॉक्टर सभासद उपस्थित होते प्रथमतः डॉ.शशांक तुसे, डॉ . काजल तुसे यांनी सपत्नीक धन्वंतरीचे पूजन व आरती केली .यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. नरेंद्र सूर्यवंशी यांना देण्यात आला तो त्यांनी पूर्ण परिवारासोबत स्वीकार केला यावेळी त्यांचे वडील मधुकर सूर्यवंशी सर व डॉ.नरेंद्र सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रथेप्रमाणे यावेळी नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून डॉ. गणेश चव्हाण व सेक्रेटरी म्हणून डॉ. संदीप पाटील व खजिनदार म्हणून डॉ.धर्मदाय दुकळे तसेच उपाध्यक्ष म्हणून डॉ. योगिनी गणेश चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. अतुल नावंदर व खजिनदार उदय मेघावत यांनी त्यांचा कार्यभार नूतन कार्यकारणीचे अध्यक्ष गणेश चव्हाण व खजिनदार धर्मराज दुकळे यांच्याकडे सुपूर्त केला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विचार सभा पार पडली डॉ. वाय पी जाधव यांच्या हस्ते डॉ.सूर्यवंशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉ.असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. डॉअनिल वानखेडे, डॉ. रमण गादिया, डॉ. वाय पी जाधव, डॉ. सुनील तुसे, डॉ रवींद्र वाघ, श्री व सौ डॉ. बोराडे, श्री व सौ डॉ.शितल व सचिन अत्रे, श्री व सौ नाईक, श्री व सौ मेगावत, श्री व सौ नावंदर, श्री व सौ राठोड, श्री व सौ डॉ.अमित गायकवाड,डॉ. कीर्ती आहेर,डॉ.परितोष गुप्ता व गुप्ता परिवार, डॉक्टर विवेक काकळीज व सौ काकळीज डॉ.अमित गादिया, डॉश्री व सौ सागर भिलोरे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सचिन पगार, श्री व सौ श्रीकांत देवरे डॉ. तुषार गोराडे, डॉ. तेजस पवार,डॉ.संदीप घोडके डॉ. मनोज कोरडे, डॉ. महेश सुरसे हे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विवेक तुसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी प्रयत्न केले डॉ.हर्षद तुसे व डॉ. सौ ख्याती तुसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.