loader image

मराठा आरक्षण संदर्भातील कागदपत्रां बाबत तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष पुरवावे – मनमाड शहरप्रमुख बोरसे यांचे निवेदन

Nov 18, 2023


मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा/तालुका स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना होऊन अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यामाध्यमातून शासन आदेशान्वये १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याची स्कॅनिंग करून जतन करावयाचे आहे, तसेच त्याची माहिती समितीकडे जमा करायचे आहे.
नांदगाव तालुक्यातील महसुली, भूमी अभिलेख, महसुली शैक्षणिक अभिलेख, जन्म मृत्यू नोंदवह्या तसेच इतरही शासकीय कार्यालयातील उर्दू मोडी लिपी जाणकार व्यक्तींच्या माध्यमातूनही मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी नोंदीचे काळजीपूर्वक दस्तावेज शोधण्याचे काम समितीने करणे अपेक्षित असून नांदगाव
तालुक्यातील मराठा समाजाच्या अनेक कुणबी प्रमाणपत्र मागणीचे प्रस्ताव प्रलंबित राहिलेले असून नोंदी न सापडल्याने पात्र असतांना सुद्धा समाज हा आरक्षणापासून वंचित राहत असल्याने तालुक्यात प्रचंड रोष तयार झालेला आहे. या सर्वांना न्याय देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून मिळणे गरजेचे असून
शासकीय कार्यालयातून दस्तावेज जमा करण्याचे नियोजन हे काळजीपूर्वक व गांभीर्याने करण्यात यावे सदरील कामकाजात कार्यपद्धतीवर तहसीलदारांनी स्वतः लक्ष ठेवून जास्तीत जास्त कागदपत्रांची छाननी करावी व मोडी उर्दू जाणकार यामध्ये नेमून सर्व शासकीय विभागातील नोंदीचे दस्त तपासण्यात यावी तसेच
सदरील विषय हा सर्वसामान्य मराठा लोकांच्या जीवनाशी, भावी पिढीच्या भविष्याशी निगडित असल्याने या प्रक्रिया औपचारिक न होता गांभीर्याने घेऊन त्या पूर्ण करण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन शहरप्रमुख मयूर बोरसे, नाना शिंदे, सुनील हांडगे, गणेश सोमासे, ललित रसाळ आदींनी तहसीलदार मोरेंना दिले.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.